IND vs ZIM : रोहितने एवढा वर्ल्ड कप जिंकून दिला तरी BCCI ने केली मोठी चूक

One star jersey In IND vs ZIM T20I Series : टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेचा पराभव केला अन् दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं. अशातच आता बीसीसीआयने मोठी चूक केलीये.

Saurabh Talekar | Jul 07, 2024, 20:09 PM IST
1/5

दोन स्टार अपेक्षित

टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दोन वेळा कप उचललाय. त्यामुळे टीम इंडियाच्या जर्सीवर दोन स्टार असणं अपेक्षित आहे.

2/5

जुनी जर्सी

सध्या सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या झिम्बॉब्वेविरुद्धच्या टी-ट्वेंटी सिरीजमध्ये टीम इंडिया जुन्या जर्सीसोबत खेळताना दिसतेय.

3/5

दोन वर्ल्ड कप

मात्र, टीम इंडिया दोन वर्ल्ड कप जिंकले असताना एका स्टारच्या जर्सीसोबत का खेळत आहे. त्याचं कारण काय?

4/5

वेळेचं गणित

भारताने बार्बाडोसमध्ये विश्वचषक जिंकला तेव्हा शनिवारी रात्री साडेअकरा वाजले होते. भारतीय युवा संघ सोमवारी रात्री मुंबईहून झिम्बाब्वेला रवाना झाला. 

5/5

झिम्बाब्वे सिरीज

इतक्या कमी वेळेत दोन स्टारसह संपूर्णपणे नवीन किट तयार करणं फार कठीण होतं, म्हणून गिलच्या टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्धच्या सिरीजमध्ये जुनीच जर्सी घातली आहे.