जास्त पाणी प्यायल्याने Bad Cholesterol नियंत्रणात राहतं का? आरोग्य तज्ज्ञ म्हणतात...

Cholesterol Health Tips: पाणी आणि कोलेस्ट्रॉल याचा संबंध आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना वारंवार पडतो. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही आरोग्य तज्ज्ञांना विचारलं. 

Jun 11, 2024, 10:23 AM IST
1/7

खराब जीवनशैलीमुळे धमन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागतं. त्यामुळे आपल्या शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. 

2/7

खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढतो. त्यामुळे हृदय निरोगी ठेवायचं असेल तर त्याला कोलेस्टेरॉलपासून दूर राहणं गरजेच आहे. 

3/7

आपल्या प्रत्येकाच्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक चांगला कोलेस्ट्रॉल आणि दुसरा वाईट कोलेस्ट्रॉल. वाईट कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राहिलं नाही तर आरोग्यासंबंधात अनेक समस्या निर्माण होतात. 

4/7

वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैली बदलण्याची गरज आहे. त्याशिवाय खाण्याच्या सवयी आणि आहाराचे योग्य पालन करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. 

5/7

आपले शरीर 70 टक्के पाण्याने बनलेले असल्यामुळे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी दिवसभर पाणी प्यायला हवं. अनेक संशोधनांतून हे सिद्ध झालंय की कमी पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉलवरही मोठा परिणाम होतो. 

6/7

पाणी प्यायल्याने शिरांमध्ये साचलेली घाण निघून जाण्यास मदत मिळते. त्याच वेळी, जर तुम्ही कमी पाणी प्यायल्यात, तर रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली घाण ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढतं. 

7/7

निर्जलीकरणामुळे यकृत रक्तात अधिक कोलेस्टेरॉल बनवतं. जास्त पाणी प्यायल्यास उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. याशिवाय रुग्णांनी फायबर आणि प्रोटीनयुक्त आहाराच सेवन करावं. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)