तुमची नजर कमकुवत झाली आहे का? 'या' 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !

Weak Eye sight : तुमची नजर कमकुवत झाली आहे का? तासनतास मोबाईल पाहून तसेच लॅपटॉप आणि संगणक समोर बसून काम करताना डोळे थकतात. अशावेळी कामातून थोडा ब्रेक घ्या. डोळे गोल गोल फिरवा. या 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !

Jul 05, 2023, 11:13 AM IST
1/7

आजकाल कमी वयातच चष्मा लागत आहे.  कारण डोळ्यांची व्यवस्थित काळजी न घेतल्याचे हे लक्षण आहे. पोषक तत्वांची कमतरता हे अनुवांशिक कारण असू शकते. डोळ्यांच्या दृष्टी सुधारण्यासाठी तुम्ही लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करु शकता. 

2/7

Yoga For Weak Eye sight : पामिंग एक्सरसाईज केल्याने दृष्टी सुधारते. यामुळे डोळे रिलॅक्स राहतात. थकवा दूर होतो. पामिंग व्यायाम करण्यासाठी आपल्या दोन्ही हातांना एकमेकांवर घासा आणि काही वेळासाठी डोळ्यांवर ठेवा. 5 ते 7 वेळा हा उपाय केल्याने डोळ्यांचा थकवा दूर होण्यास मदत होईल.  

3/7

अनेक तास मोबाईल पाहून तसेच लॅपटॉप आणि संगणक समोर बसून काम करताना डोळे थकतात. अशावेळी कामातून थोडा ब्रेक घ्या. डोळे गोल गोल फिरवा. क्लॉकवाईज आणि एंटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये कमीत कमी  5 वेळा डोळे फिरवा. दिवसातून दोनवेळा हा उपाय केल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळे चांगले राहतात.

4/7

पापण्या उघडझाप करा. त्यामुळे डोळ्यांवरील ताण  दूर होतो. दोन सेकंद डोळे बंद करा, नंतर उघडा आणि 5 सेकंद सतत ब्लिंक करा. हे किमान 5-7 वेळा पुन्हा करा. असे केल्याने डोळ्यांचा थकवा आणि लाल डोळ्यांची समस्या दूर होईल.

5/7

डोळे निरोगी ठेवण्याचा अतिशय सोपा आणि ट्रेंडी मार्ग म्हणजे 20-20-20 नियम. तुम्हाला फक्त लॅपटॉपवर काम करताना दर 20 मिनिटांनी ब्रेक घ्यावा लागेल आणि तुमच्यापासून किमान 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद पाहावे लागेल. या व्यायामामुळे दृष्टी चांगली होण्यास मदत होते.

6/7

डोळ्यांना दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच धुम्रपान, मद्यपान यांसारख्या हानिकारक सवयीही मर्यादित प्रमाणात सेवन कराव्यात. 

7/7

नेत्र तपासणीसाठी नियमितपणे डॉक्टरांकडे जा. लहान मुलांचे डोळे लवकर खराब होतात, अशा स्थितीत त्यांची नियमित नेत्र तपासणी करणे आवश्यक आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)