Rohit sharma: रात्रभर झोपलो नाही, कुस बदलत राहिलो; फायनलपूर्वीच्या रात्रीची आठवण सांगताना गहिवरला हिटमॅन

T20 वर्ल्डकप 2024 च्या फायनल सामन्यात रोहित शर्माने भारतीय चाहत्यांची अनेक वर्षांपासून असलेली इच्छा पूर्ण केली. शनिवारी रात्री तोच रोहित शर्मा होता जो २०२३ च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील स्वप्न भंगल्यानंतर रडत मैदानाबाहेर गेला होता. 

| Jun 30, 2024, 11:18 AM IST

T20 World Cup 2024 Final: T20 वर्ल्डकप 2024 च्या फायनल सामन्यात रोहित शर्माने भारतीय चाहत्यांची अनेक वर्षांपासून असलेली इच्छा पूर्ण केली. शनिवारी रात्री तोच रोहित शर्मा होता जो २०२३ च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील स्वप्न भंगल्यानंतर रडत मैदानाबाहेर गेला होता. 

1/7

टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हरलेला सामना जिंकून आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ अखेर संपवला. 

2/7

यानंतर रोहित शर्माचं वेगळं रूप चाहत्यांना पाहायला मिळालं. विजेतेपदानंतर हिटमॅनने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

3/7

रोहित शर्मा सामन्यानंतर म्हणाला, 'मी रात्रभर नीट झोपू शकलो नाही, हे अगदी खरं आहे. मी फक्त कुस बदलत होतो. मला 2007 चा वर्ल्ड कप आठवला, 2011 आठवला आणि 2013 पण आठवला. 

4/7

मला अजून काय बोलावं ते कळेना. ट्रॉफी जिंकल्यानंतरच्या भावनांचं वर्णन करणं खूप कठीण आहे, असंही रोहितने सांगितलं. 

5/7

या संपूर्ण स्पर्धेत टीमतील मुलांनी मला खूप पाठिंबा दिला, यासाठी मी त्यांचा आभारी आहे. यावेळी रोहित शर्मानेही दिग्गज विराट कोहलीचं कौतुक केले.

6/7

माझा विश्वास आहे की, जे लिहून ठेवलं ते घडणारचं. आणि वर्ल्डकप जिंकणं हे लिहून ठेवलं होतं. फक्त मॅचपूर्वी तुम्हाला माहिती नसतं की, हेच लिहून ठेवलंय आणि हाच खरा खेळ असतो, असं रोहितचं म्हणणं होतं. 

7/7

चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगल्या गोष्टी घडतात. त्यामुळे आता तुम्ही सांगितलंय म्हणजे मी चांगलाच असणार, असं हसत हसत रोहित म्हणाला.