लांब पल्ल्याच्या प्रवासात रेल्वेत किती वेळ झोपू शकतो? प्रवाशांना हा नियम माहितच असला पाहिजे

रेल्वे प्रवासात किती वेळ झोपू शकतो याबाबतचा नियम काय आहे जाणून घेऊया. 

वनिता कांबळे | Jul 01, 2024, 21:50 PM IST

Indian Railway Sleeping Rule: भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत देश रेल्वेने जोडला आहे. यामुळे अनेक प्रवासी हे लांब पल्ल्याचा प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवासी किती वेळ झोपू शकतात याबाबतचा नियम काय आहे जाणून घेऊया. 

1/7

लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवासी ट्रेनमध्ये किती वेळे झोपू शकतात याबाबत रेल्वेने काही नियम घालून दिले आहेत. प्रवाशांना हे नियम माहित असले पाहिजेत. 

2/7

खालच्या बर्थमध्ये असलेले आरक्षित तिकिट प्रवासी रात्री 10 ते सकाळी 6 च्या नंतर आपल्या सीटवर झोपू शकत नाहीत. कोणी या नियमाचं उल्लंघन केलं तर तक्रार दाखल करता येऊ शकते.

3/7

नव्या नियमानुसार प्रवाशांना 8 तास झोपण्याचा नियम बनवला आहे. जेणेकरुन लांबच्या पल्ल्याचे प्रवासी आरामात झोपू शकतात.

4/7

 हा नियम लागू होण्याच्या अगोदर प्रवासी तक्रार करायचे की, मिडल बर्थचे प्रवासी रात्री लवकर झोपायचे आणि सकाळी उशीरापर्यंत झोपून रहायचे. ज्यामुळे बसणाऱ्यांना त्रास व्हायचा.  

5/7

पूर्वीच्या नियमानुसार प्रवाशांना 9 तास झोपण्याची सुविधा दिली जायची. नव्या नियमांनुसार, प्रवासी रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत झोपू शकतात.  

6/7

अनेकदा रेल्वे प्रवास 2 ते 3 दिवसांचा असतो. लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवासी किती वेळ झोपू शकतात याबाबत रेल्वेने जो नियम बनवला आहे त्यामागे कारण आहे.

7/7

अनेकदा रेल्वे प्रवास 2 ते 3 दिवसांचा असतो. लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवासी किती वेळ झोपू शकतात याबाबत रेल्वेने जो नियम बनवला आहे त्यामागे कारण आहे.