Rajmata Jijau Punyatithi 2024 : राजमाता जिजाऊ यांची आज तिथीनुसार पुण्यतिथी, WhatsApp Status ठेवून करा मानाचा मुजरा

Rajmata Jijau Punyatithi Abhivadan in Marathi :  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांची आज तिथीनुसार पुण्यतिथी आहे. यानिमीत्ताने WhatsApp Status ठेवून करा मानाचा मुजरा

Jun 30, 2024, 09:15 AM IST
1/8

जिजाऊ ची गौरव गाथा तिच्या चरणी माझा माथा.. स्वराज्यप्रेरिक राजमाता राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांना स्मृतिदिनी मानाचा मुजरा !

2/8

ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं बीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रोवलं, त्यांच्या अंगी अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती बाणवली अशा आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान, राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन  

3/8

मराठ्यांचा इतिहास घडवणारी एक स्वराज्यप्रेरिका महिला स्वराज्याचे स्वप्न फुलवले, जोपासले व पूर्ण केले अशा जीजाऊ मातेच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन  

4/8

शिवराय अन शंभू छावा तुमच्या शिवाय नसता मिळाला आम्हांला स्वराज्याचा ठेवा जय जिजाऊ! जीजाऊ मातेच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन  

5/8

 चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार… थोर तुमचे कर्म जिजाऊसाहेब उपकार कधी ना फिटणार… स्वराज्य प्रेरीका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!!  

6/8

ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्यज्योती याच माऊली ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती राजमाता जिजाबाईंना अभिवादन !  

7/8

मुजरा त्या मातेला, जिने घडविला राजा रयतेचा ।। गनिमांस तिने नमविला, वसा स्वराज्याचा चालविला।। राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार अभिवादन

8/8

मराठ्यांचा इतिहास घडवणारी,  स्वराज्य प्रेरिका,  राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन