वयाच्या पंचविशीत करा 'हे' काम, 45 व्या वर्षानंतर आयुष्यभर आराम! दरमहा मिळतील 80 हजार

Pravin Dabholkar | Jul 02, 2024, 07:17 AM IST
1/9

वयाच्या पंचविशीत करा 'हे' काम, 45 व्या वर्षानंतर आयुष्यभर आराम! दरमहा मिळतील 80 हजार

SIP Calculator Mutual Fund Retirnment Planning Investment Personal Finance Marathi News

SIP Retirnment Planning: एकदा का नोकरीधंद्याला लागलो की अनेकजण रिटार्टमेंटचा प्लानिंग करायलाही सुरुवात करतात. इथे प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता असते. उतारवयात जर नोकरी नसेल तर आयुष्य कसे चालेल? हा प्रश्न प्रत्येकालाच सतावतो. म्हातारपणी कोण साथ देईल? या सर्व चिंतेपासून मुक्त होण्यासाठी लोक गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय शोधतात.

2/9

गुंतवणुकीचे पर्याय

SIP Calculator Mutual Fund Retirnment Planning Investment Personal Finance Marathi News

बाजारात अनेक प्रकारचे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. यात सर्वात कमी जोखमीच्या गुंतवणुकीला म्युच्युअल फंड म्हणतात. यामध्ये इक्विटीपेक्षा कमी परतावा मिळतो. असे असले तरी ते यातील बाजारातील जोखीमदेखील तुलनेत कमी असते.

3/9

महिन्याला फक्त 10,000 रुपये गुंतवा

SIP Calculator Mutual Fund Retirnment Planning Investment Personal Finance Marathi News

तुमचे वय 20-25 वर्षांच्या दरम्यान आहे तर आताच एक गुंतवणूक योजना बनवा. पुढच्या 20 वर्षांपर्यंत दरमहा फक्त 10,000 रुपये गुंतवायला सुरुवात करा. असे केल्यास निवृत्तीवेळी तुम्ही दरमहा 70 ते 80 हजार रुपये काढू शकता. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला ही रक्कम पुरेल.

4/9

अशी कोणती योजना?

SIP Calculator Mutual Fund Retirnment Planning Investment Personal Finance Marathi News

अशी कोणती योजना आहे? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. 10 हजार गुंतवण्याचे तेच जुने गुंतवणुकीचे प्लानिंक आहे का? असे तुम्हाला वाटेल. पण सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅनबद्दल आपण जाणून घेऊया.

5/9

दरमहा 70 हजार रुपये काढू शकता

SIP Calculator Mutual Fund Retirnment Planning Investment Personal Finance Marathi News

तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षापासून पुढील 20 वर्षे दरमहा 10 हजार रुपये SIP करत असाल, तर त्यानंतर निवृत्तीवेळी तुम्ही दरमहा 70 हजार रुपये काढू शकता, इतकी तुमची रक्कम जमा झालेली असेल. 

6/9

24 लाख रुपये गुंतवणूक

SIP Calculator Mutual Fund Retirnment Planning Investment Personal Finance Marathi News

20 वर्षांमध्ये दर महिन्याला 10 हजारप्रमाणे एकूण गुंतवणूक 24 लाख रुपये होते. जर तुम्ही 20 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये SIP करत असाल आणि तुमचा म्युच्युअल फंड तुम्हाला दरवर्षी सरासरी 12 टक्के परतावा देईल असे मानुया. 20 वर्षांत तुम्ही एकूण 24 लाख रुपये गुंतवले आणि त्यावर 12% दराने 75 लाख परतावा तुम्हाला मिळेल.

7/9

12 टक्के रिटर्न्स

SIP Calculator Mutual Fund Retirnment Planning Investment Personal Finance Marathi News

यावर तुम्हाला 12 टक्के रिटर्ननुसार अंदाजे 75 लाख 91 हजार 479 रुपये व्याज स्वरुपात मिळतील. म्हणजे 20 वर्षांनंतर तुमच्याकडे अंदाजे एक कोटी रुपये म्हणजेच 99 लाख 91 हजार 479 रुपये असतील.

8/9

20 वर्षांनंतर दरवर्षी 12 लाख रुपये परतावा

SIP Calculator Mutual Fund Retirnment Planning Investment Personal Finance Marathi News

20 वर्षांनंतर तुम्ही ही कोटींची रक्कम म्युच्युअल फंडात ठेवाल तर तुम्हाला यावर 12 टक्के परतावा मिळत राहील. म्हणजेच तुम्हाला दरवर्षी अंदाजे 12 लाख रुपयांचा परतावा मिळेल. 

9/9

दरमहा 80 हजार रुपये

SIP Calculator Mutual Fund Retirnment Planning Investment Personal Finance Marathi News

तुम्हाला दरवर्षी 12 टक्के परतावा मिळाला आणि जर तुम्ही त्यातले 9.6 टक्के दरवर्षी जरी काढायचे ठरवले तरी तुम्हाला दरमहा 80 हजार रुपये मिळतील. तुमचे पैसे कधीच संपणार नाहीत, उलट वाढतच जातील.