हेच 'ते' पदार्थ ज्यामुळे मेंटल हेल्थचा आजार होऊ शकतो... वाचा

मुंबई : योग्य आहारचं सेवन केल्याने आरोग्य निरोगी राहतं. अनेक अभ्यासातून असं सिद्ध झालं आहे की, विशिष्ट प्रकारच्या आहारामुळे मेंटल हेल्थ संदर्भात आजार निर्माण होतात. असे कोणते पदार्थ आहेत, ज्यामुळे अशा आजारांना सामोरं जावं लागतं ते जाणून घेऊया....

Sep 29, 2022, 17:40 PM IST
1/3

साखर

साखर खाल्ल्याने शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते हे सत्य आहे पण त्याच साखरेचं प्रमाण जास्त झाल्याने अनेक आजारांना आमंत्रण दिलं जाऊ शकतं. कर्डिओवॅकुलर आजार, टाईप 2 डायबिटीज (type 2 diabetes)  आणि फॅट लिव्हर डिजिजटची रिस्क वाढवते. त्यासोबतच, गोड चव असणारे ड्रिंक्स प्यायल्याने न्यूरोलॉजिकसकल हेल्थवर देखील त्याचा वाईट परिणाम होतो.

2/3

लो- कॅलरी फूड्स

वजन मेंटेन ठेवण्यासाठी अनेकदा कमी कॅलरीचा आहार घेताला जातो. यापद्धतीच्या आहारात शक्यतो कार्ब्स, फॅट्स आणि आणि साखरेचं प्रमाण अधिक प्रमाणात असतं. अशा आहारामुळे मेंटल हेल्थ संदर्भातील समस्या निर्माण होतात. तज्ज्ञांच्या मते, अशा पद्धतीच्या आहाराचं सेवन करणं टाळावं.

3/3

सॅच्यूरेटेड फॅक्ट्स

बर्गर, फ्राईज आणि इतर डीप-फ्राईड फूड्सचं सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि फॅट्सचं प्रमाण वाढतं. सायन्स जर्नल पीएलओएस वन ( journal PLoS ONE) च्या अभ्यासानुसार, अशा आहारामुळे डिप्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. (Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)