Diabetes: उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी 'अशी' घ्यावी आरोग्याची काळजी, अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान

Diabetes Tips For Summer : मधुमेह हा भारतातील सामान्य आजार आहे. अनेकांना लहान वयातच मधुमेह होतो. शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. मधुमेहा  हा आजार मरेपर्यंत बरा होत नाही, पण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. शरीरातील साखरेवर नियंत्रण न राहिल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे रुग्णांना वारंवार भूक व तहान लागते तर अनेकांना वारंवार जुलाबाचा त्रास होतो. उन्हाळा सुरू झाला की अनेक मधुमेही रुग्ण डिहायड्रेशनचे बळी ठरतात. उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांना तीव्र उष्णता आणि थकवा जाणवतो. त्यामुळे उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Apr 28, 2024, 17:03 PM IST
1/7

सनस्क्रीनची गरज

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी जशी पाण्याची गरज आहे तशी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी सनस्क्रीनची गरज आहे. कारण सनबर्नमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, यामुळे चक्कर, थकवा या समस्या उद्भवू शकतात. यामुळे सनस्क्रीनचा वापर करत तुम्ही तीव्र उष्णापासून स्वत:चं रक्षण करू शकता.  

2/7

फायबरयुक्त आहार

फायबरयुक्त आहार पचनासाठी उत्तम असते. यामुळे तुमचे पोट भरल्यासारखे वाटते ज्यामुळे तुम्ही कमी अन्न खाता. तसेच रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रणात राहते.

3/7

ताज्या ज्यूसची गरज

उन्हाळ्यात ताजेतवाने राहण्यासाठी थंड ताज्या ज्यूसची गरज असते. परंतु जास्त साखर असलेल्या ज्यूसमुळे शरारीतील साखरेचे प्रमाण पुन्हा वाढू शकते. त्यामुळे कमी साखर असलेल्या फळांचा ज्यूस प्या. याशिवाय घरीच्या घरी ज्यूस बनवून पिऊ शकता. 

4/7

सैल कपडे घालणे

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी हलक्या रंगाचे आणि सैल कपडे घालणे गरजेचे आहे. कारण फिट कपड्यांमुळे तुम्हाला उन्हाळ्यात गुदमरल्यासारखे वाटू शकते. यामुळे पांढरा, निळा अशा रंगाचे सुती कापडाचे कपडे घाला. 

5/7

इन्सुलिनची वेळेवर तपासणी करा

रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिनची वेळेवर तपासणी करणे गरजेचे आहे. जर तुमच्या शरीरात काही बदल जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच ऋतूनुसार कोणत्या औषधांचा डोस बदलण्याची गरज असेल तर डॉक्टरांकडून बदलून घ्या. कारण अनेकदा काही गोळ्या किंवा औषधांमुळे पोटात उष्णता वाढते.

6/7

नियमित व्यायाम करा

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे असतेच पण शारीरिक हालचालीही आवश्यक असतात. या कारणास्तव, नियमित व्यायाम करा. सकाळी किंवा संध्याकाळी किमान 20 मिनिटे चाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दुपारी लवकर घराबाहेर पडू नका.  

7/7

भरपूर पाणी पिणे

मधुमेहाच्या रुग्णांनी उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. शरीराला फायदेशीर पेये प्यावे. पण मद्यपान केल्याने शरीरातील साखरेची पातळी वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.    (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)