'आमिर खानच्या प्रोडक्शनमधून आलेला मेसेज 20 दिवस वाचलाच नाही, अन् अखेर...', नम्रता संभेरावचा खुलासा

छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कॉमेडी शोमधील अभिनेत्री नम्रता संभेरावचे लाखो चाहते आहेत. नम्रता संभेराव ही मालिका, कॉमेडी शो आणि चित्रपट सगळ्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. नम्रताच्या चाहत्यांमध्ये बॉलिवूड कलाकारांची देखील नावं आहेत. त्यात जॉनी लिव्हर यांचं नाव आहे. दरम्यान, नम्रतानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला आमिरच्या प्रोडक्शन हाऊसमधून फोन आल्याचा खुलासा केला आहे.   

| Apr 28, 2024, 16:38 PM IST
1/7

नम्रता संभेराव

नम्रताला आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसमधून ऑडिशनसाठी फोन आल्याचा खुलासा नम्रतानं केला आहे. 

2/7

आमिर खानचं प्रोडक्शन हाऊस

"मला काही दिवसांपूर्वी आमिर खानच्या प्रोडक्शनमधून चित्रपटाच्या ऑडिशनसाठी फोन आला होता. स्वत: आमिर खान सरांनी माझं नाव सुचवलं, असं त्यांनी मल सांगितलं. माझ्याशी त्यांना संपर्क करता येत नव्हता." 

3/7

इन्स्टाग्रामवर मिळाली ऑफर

"त्यांनी मला इन्स्टाग्रामवर मेसेज केला होता. पण, तो मेसेज रिक्वेस्टमध्ये गेला. जेव्हा त्यांचा फोन आला तेव्हा ते मला म्हणाले की 20 दिवसांपासून आम्ही तुम्हाला कॉल करत आहोत."

4/7

आमिरनं सुचवलं नाव

कॉलवर नम्रताला सांगितलं की "आगामी प्रोजेक्टसाठी आमिर खान सरांनी तुमचं नाव सुचवलं, म्हणून आम्ही तुम्हाला शोधत होतो." 

5/7

कोणती भूमिका?

"ही एका खलनायिकेची भूमिका आहे. मी ऑडिशन तर दिलंय. आता त्यात माझी निवड होईल की नाही माहित नाही... पण मला एक माहित आहे ते म्हणजे मी इथपर्यंत पोहोचले हेच माझ्यासाठी खूप आहे", असं नम्रता 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. 

6/7

नम्रताचा आगामी चित्रपट

नम्रता 'नाच गं घुमा' या चित्रपटात मदतनीसच्या भूमिकेत दिसणार आहे. 

7/7

कधी होणार प्रदर्शित?

या चित्रपटाचं दिग्दर्शक परेश मोकाशीनं केलं आहे तर पटकथा हे मधुगंधा कुलकर्णी चं आहे. तर या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुकन्या मोने, सारंग साठ्ये हे कलाकार दिसणार आहेत. तर 1 मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.