Dharmendra : हेमा मालिनीपूर्वी धर्मेंद्र 'या' मुस्लिम अभिनेत्रीच्या पडले होते प्रेमात

Bollywood Gossip : त्याकाळातील सर्वात रोमँटिक अभिनेता म्हणून धर्मेंद्र यांच्याकडे पाहिलं जातं. आजही वयाच्या  87 व्या वर्षीही रुपरी पडद्यावर लिप लॉक करुन त्यांनी सर्वांचं धक्का दिला. हेमा मालिनीसोबतची त्यांची लव्ह स्टोरी कायम चर्चेचा विषय राहिली पण तुम्हाला माहिती धर्मेंद्र अजून एका मुस्लिम अभिनेत्रीच्या प्रेमात होते. 

Aug 06, 2023, 13:59 PM IST

Dharmendra Unknown Facts : करण जोहरच्या रॉकी आणि राणी या चित्रपटातून शबाना आझमीसोबतच्या धर्मेंद्र यांनी लिपलॉक सीन केला आणि ते पुन्हा चर्चेत आले. 87 व्या वर्षीही स्क्रीनवर रोमान्स करताना धर्मपा दिसले आणि चाहत्यांचा भुवयाच उंचावल्या. 

 

1/12

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्ह स्टोरी, त्यानंतर लग्नाबद्दल सगळ्यांना माहिती आहेत. हेमा मालिनीशी लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्विकारला.

2/12

पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, इस्लाम धर्म आणि हेमा मालिनी यांच्यापूर्वी ते एका मुस्लिम अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते. 

3/12

त्या काळात बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र रोमँटिक हिरो म्हणून प्रसिद्ध होतो. त्यांची मोहिनी अशी होती की, विवाहित असूनही अनेक अभिनेत्री धर्मेंद्रच्या प्रेमात पडल्या होत्या. 

4/12

 शबाना आझमी यांना चित्रपटात लिप लॉक केल्यानंतर धर्मेंद्र चर्चेत आले. मीडिया रिपोर्टनुसार त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारीसोबत धर्मेंद्र यांचं अफेअर होतं असं म्हणतात. 

5/12

तुम्हाला हे माहितीच असेल की, मीना कुमारी यांचं खरं नाव मेहजबीन असं होतं. त्या मुस्लिम समाजातील होत्या. चित्रपटसृष्टी आल्यावर त्यांनी नाव बदललं. 

6/12

1965 मधील पौर्णिमा या चित्रपटात धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं. त्यावेळी मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांचं वैवाहिक जीवनात तणाव होता.   

7/12

कमाल आणि मीना कुमारी यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्या एकट्या पडल्या. अशात धर्मेंद्र यांनी त्यांना आधार दिला आणि तेव्हा ती त्यांच्या प्रेमात पडली.   

8/12

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, धर्मेंद्र यांनी अनेकवेळा जाहीरपणे सांगितलं की, त्यांच्या यशामागे मीना कुमारीचा हात आहे. 

9/12

धर्मेंद्र आणि मीना कुमार यांचं अफेअर सुमारे तीन वर्षे सुरु होतं. एकदा नशेमध्ये असताना धर्मेंद्र यांनी विमानतळावर मीन मीना असं ओरडत गोंधळ घातला होता. 

10/12

मीना माझी वाट पाहत आहे, मला मुंबईला परत जावं लागले. धर्मेंद्र यांच्या कृत्यने त्यांचा प्रेमप्रकरणाचा सर्वत्र गाजावाजा झाला. 

11/12

मीना कुमारी आणि धर्मेंद्र एकदा पिकनिकला गेल्या होत्या. तिथून परताना धर्मेंद्र मीना कुमारीच्या कारमध्ये न बसता दुसऱ्याच कारमध्ये बसले. तेव्हा मीना कुमारही धरम कुठे आहे धरम कुठे असा आरडाओरडा केला. 

12/12

पण या नात्यात एक क्षण आला की त्यांचं नातं तुटलं. झालं असं की, धर्मेंद्र यांनी एका कार्यक्रमात सर्वांसमोर मीना कुमारी यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्यांच्यामधील नातं तुटलं.