पुन्हा देवाभाऊ..! मॉडेल ते मुख्यमंत्री, अनेक चढउतारानंतर महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र, फडणवीस यांची संपत्ती किती?

Devendra Fadnavis : महायुतीने विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालंय. देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे राज्यात जल्लोषाच वातावरण आहे. 

नेहा चौधरी | Dec 04, 2024, 14:45 PM IST
1/13

 महायुतीचा शपथविधी सोहळा गुरुवारी 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर संध्याकाळी 5.30 वाजता होणार आहे. बुधवारी झालेल्या भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालं. भाजपचा अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अनुमोदन दिलंय. त्यानंतर राज्यात पुन्हा देवाभाऊचं सरकार असणार यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंद आहे. पुन्हा एकदा केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असणार आहे. 

2/13

देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील पाचवे आणि नागपूरचे तिसरे मुख्यमंत्री आहेत. नगरसेवक, महापौर, विरोधीपक्षनेते, उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या पाच वर्षात त्यांनी गेल्या पाच वर्षात त्यांनी मुख्यमंत्री, विरोधीपनेते, उपमुख्यमंत्री अशी तिन्ही महत्वाची पदे भूषविली आहेत. त्यांनी राजकारणात तरुण राजकारणी म्हणून आपला एक वेगळा ठसा उमटलाय.

3/13

घरातूनच लहानपणापासून वडील गंगाधरराव फडणवीस यांच्याकडून त्यांना राजकारणा बाळकडू मिळाला. त्यामुळे लहान वयातच संघाचे सदस्य, नगरसेवक, महापौर, आमदार, भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. 

4/13

अवघ्या 22 व्या वर्षी देवेंद्र फडणवीस हे नागपूर महानगरपालिका निवडणूक जिंकले. त्यानंतर 27 व्या वर्षी त्यांच्या गळात महापौरपदाची माळ पडली. त्यानंतर अवघ्या दोन वर्षात त्यांनी विधानसभा गाठली. 

5/13

विधानसभेत त्यांनी उत्कृष्ट संसदपटूचा बहुमान मिळाला. राज्यात आपला दबदबा निर्माण केल्यानंतर दिल्लीतही मोदींचे सगळ्या विश्वासू नेते बनले. 2014 मध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर राज्याला देवेंद्र फडणवीसांच्या रुपात तरुण मुख्यमंत्री मिळाला. 

6/13

पाच वर्षाच्या काळात त्यांनी जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, शहराला जोडणारे मेट्रो प्रकल्पांवर भर दिला. राज्याचा विकास हेच भाजपचं ध्येय घेऊन त्यांनी प्रशासनात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी अनेक कायदे अमलात आणले. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, कृषी यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा या योजनेतून शेतकऱ्यांना दिलासा दिला. 

7/13

महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेत ते विरोधीपक्षाच्या बाकावरही बसले तरी त्यांचा दबदबा कायम दिसून येत होता. त्यावेळी त्यामधील विरोधपक्ष नेताची एक वेगळ रुप जनतेने पाहिलं. अधिवेशनात विविध मुद्द्यांवर त्यांनी सरकारला चोहूबाजूने धारेवर धरले. 

8/13

त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदेला हाताशी घेऊन देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप आला. महायुतीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली. उपमुख्यमंत्रीपदासह त्यांनी गृहमंत्र्यांची जबाबदारी पार पाडली. 

9/13

महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ होणारे देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती किती आहे ते पाहूयात. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती ही 13.27 कोटींच्या घरात आहे. यात त्यांच्या पत्नीवर 62 लाखांचं कर्ज असून 2023-24 मध्ये त्यांचं उत्पन्न 79.3 लाख आहे. 

10/13

तर पत्नी अमृता फडणवीस यांचं बँक बॅलेन्स पाच लाखांहून जास्त आहे. तर शेअर बाजार, बॉण्ड या डिबेंचर्समध्ये देवेंद्र फडणवीस यांची कोणती गुंतवणूक नाही. मात्र त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांची 5.63 कोटींची बॉण्ड,शेअर आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक पाहिला मिळते. या शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या NSS-Postal Saving खात्यात 17 लाख असूनत त्यांच्याकडे तीन लाख रुपयांची एलआयसीची पॉलिसी आहे.   

11/13

जंगम संपत्तीबदद्ल बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 450 ग्रॅम सोने आणि पत्नीकडे 900 ग्रॅम सोने असून याची किंमत सुमारे 98 लाखांच्या घरात आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल फडणवीस कुटुंबाकडे त्यांच्या नावाची कार नाही. 

12/13

तर अचल संपत्तीत अमृता फडणवीस यांच्यानावावर 1.27 कोटीची एग्रीकल्चर जमीन आणि रेसिडेन्सियल प्रॉपर्टीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 3 कोटीचं एक आणि दुसरं 47 लाखाचं घर आहे. शिवाय अमृता यांच्या नावावर 36 लाखांची रेसिडेंशियल प्रॉपर्टीची नोंद आहे. 

13/13

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, राजकारणीसह ते एक मॉडेलही होते. 2006 मध्ये जवळचे मित्र विवेक रानडे यांच्या दुकानासाठी त्यांनी मॉडेलिंग केली होती. या जाहिरातीची दिल्लीत पोहोचली. अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना खास दिल्लीला बोलावून घेतलं होतं. तेव्हा त्यांचं कौतुक करताना म्हटलं व्वा व्वा क्या स्मार्ट मॉडेल है ये!