महाराष्ट्रातील सर्वात पवित्र गाव, 2 नद्यांच्या संगामामुळे पडले 2 भाग; इथंच आहे 400 वर्ष जुनं प्राचीन मंदिर

Satara : दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या संगम माहुली परिपसराचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करुन टाकते. 

वनिता कांबळे | Apr 15, 2024, 19:59 PM IST

Mahuli Sangam River :  महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रतील प्रत्येक तीर्थश्रेत्र हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. असचं एक तीर्थक्षेत्र सातारा जिल्ह्यातील माहुली येथे आहे. संगम माहुली असे या तीर्थक्षेत्राचे नाव आहे. 

1/7

कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर असल्यामुळे माहुली गावाचे दोन भाग पडले आहेत. अलीकडे ‘संगम माहुली’ आणि पलीकडे ‘क्षेत्र माहुली’.   

2/7

 छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाधी संगम माहुली येथे आहे. यामुळे या स्थळाला ऐतिहासीक वारसा देखील लाभलेला आहे.    

3/7

देवकोष्टकात डाव्या बाजूस गणपती आणि उजव्या बाजूस महिषासुरमर्दिनीच्या मुर्त्या आहेत. सभामंडपात मोठी घंटा आहे. मुख्य मंदिरावर विटांचे शिखर असून त्यावर चुन्याचा गिलावा केलेला आहे. शिखराला अनेक देवकोष्टके आहेत.मंदिरासमोर नंदीमंडप आहे त्यावर अष्टकोनी शिखर आहे.  

4/7

 तारकाकृती असणाऱ्या या मंदिराची गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप अशी रचना आहे. अंतराळ चार स्तंभांवर आधारलेले असून दोन अर्धस्तंभ असून दोन पूर्णस्तंभ आहेत. सभामंडप तिन्ही बाजूने मोकळा आहे. 

5/7

संगम माहुली येथे 400 वर्ष जुनं विश्वेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर वेण्णा नदीच्या दक्षिण काठावर, कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमस्थानावर आहे. 

6/7

संगम माहुली हे महाराष्ट्रातील दक्षिणकाशी तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. राज्य भरातून अनेक भाविक येथे धार्मिक विधी तसेच अस्थी विसर्जासाठी देखील येतात. 

7/7

 साता-यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. संगम माहुली हे तीर्थक्षेत्र आहे. येथेच 400 वर्ष जुनं  प्राचीन मंदिर आहे.