आई-वडील डॉक्टर, पण अभिनेत्याला इंजिनियर होण्यासाठी लागले 10 वर्षे, 34 व्या वर्षी मिळाली डिग्री

आई-वडील आणि बहीण डॉक्टर असून देखील बॉलिवूडमधील या अभिनेत्याला इंजिनियर होण्याठी लागले 10 वर्षे, तुम्ही ओळखलं का? 

| Jan 12, 2025, 18:49 PM IST
1/7

बॉलिवूड अभिनेता

इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार आहेत ज्यांच्याकडे वेगवेगळ्या डिग्री आहेत. मात्र, या अभिनेत्याला इंजिनियर होण्याठी 10 वर्षे लागली. नुकताच तो पदवी घेण्यासाठी तो आपल्या आईसोबत महाविद्यालयात गेला होता. 

2/7

कार्तिक आर्यन

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन सध्या आपल्या करिअरमध्ये झपाट्याने प्रगती करताना दिसत आहे. नुकतीच अभिनेत्याला इंजिनिअरिंग पदवी मिळाली आहे. 

3/7

व्हिडिओ शेअर

नुकताच अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या कॉलेजच्या समारंभाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले आहे. 

4/7

इंजिनिअरिंग पदवी

कार्तिक इंजिनिअरिंगची पदवी घेण्यासाठी आईसोबत कॉलेजमध्ये गेला होता. त्यामध्ये व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, बॅक बेंचर होण्यापासून ते पदवीपर्यंतचा प्रवास खास होता असं म्हटलं आहे. 

5/7

आठवणी

त्यासोबत डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, तू मला आठवणी, स्वप्ने आणि आता माझी पदवी दिली, जी मिळवायला मला एक 10 वर्षे लागली. धन्यवाद विजय पाटील सर असे त्याने म्हटले आहे.   

6/7

प्यार का पंचनामा

कार्तिक आर्यनला कॉलेजच्या दिवसांपासून अभिनयाची आवड होती. अशातच त्याला 'प्यार का पंचनामा' सारखा हिट चित्रपट मिळाला. मात्र, त्याने नेहमीच अभ्यासाचे महत्त्व समजून ते सोडले नाही. 

7/7

आगामी चित्रपट

कार्तिक आर्यन आगामी 'फ्रेडी 2' संदीप मोदी यांच्यासोबत 'पति पत्नी और वो 2' आणि 'आशिकी 3' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.