टीम इंडियात मिळत नाहीये संधी; तरी नेटवर्थ कोट्यवधींमध्ये, 37 वर्षीय खेळाडू कुठून कमावतो पैसा?

Cheteshwar Pujara Networth : भारताचा अनुभवी क्रिकेटर चेतेश्वर पुजारा हा शनिवार 25 जानेवारी रोजी त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. मागील काही वर्षापासून चेतेश्वर पुजाराला टीम इंडियात संधी मिळालेली नाही. परंतु तरीही पुजारा चांगली कमाई करतो तेव्हा चेतेश्वर पुजाऱ्याच्या करिअर आणि एकूण संपत्ती विषयी जाणून घेऊयात. 

Pooja Pawar | Jan 25, 2025, 15:08 PM IST
1/7

टीम इंडियाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराचा जन्म गुजरातमधील राजकोट येथे झाला. पुजाराचे वडील अरविंद आणि काका बिपिन हे देखील सौराष्ट्रसाठी रणजी ट्रॉफीमध्ये खेळले होते. 17 वर्षांचा असताना पुजाराच्या आईचे कॅन्सरमुळे निधन झाले. 

2/7

चेतेश्वर पुजाराने टेस्ट क्रिकेटमध्ये 103 सामने खेळले असून यात त्याने 7195 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 3 द्विशतक, 19 शतक आणि 35 अर्धशतक ठोकली आहेत. तर भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये पुजाराने 5 सामने खेळले असून त्यात 51 धावा केल्या आहेत. 

3/7

चेतेश्वर पुजारा हा आयपीएलचा सुद्धा भाग होता. आयपीएलमध्ये 30 सामन्यात त्याने 390 धावा केल्या असून यात त्याने 1 अर्धशतक ठोकले आहेत. चेतेश्वर पुजारने चेन्नई सुपरकिंग्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. 

4/7

चेतेश्वर पुजाराने कमी वयात मोठी संपत्ती कमावली. पुजाराची नेटवर्थ भारतीय रुपयांमध्ये 24 कोटी असून त्याची महिन्याची कमाई ही 15 लाख इतकी आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी टीम इंडियात संधी मिळत नसल्याने तो पुजारा देशांतर्गत क्रिकेटमध्ये तसेच विदेशातील लीग स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो.   

5/7

चेतेश्वर पुजारा ब्रँड इन्डॉर्समेंट्समधून सुद्धा मोठी कमाई करतो. पुजाराच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी आणि फोर्ड सारख्या गाड्या आहेत. 

6/7

चेतेश्वर पुजाराची देशांतर्गत क्रिकेटमधील कारकीर्द सुद्धा प्रभावशाली ठरली. त्याने रणजी ट्रॉफी 2017-18 मध्ये 437 धावा केल्या होत्या. पुजाराने 2019-20 रणजी ट्रॉफीमध्ये देशांतर्गत क्रिकेटमधील 50 वं शतक ठोकलं होतं. 

7/7

चेतेश्वर पुजाराने 2013 मध्ये पूजा पबारीशी विवाह केला होता. 2018 मध्ये दोघांना कन्यारत्न झाले जिचं नाव अदिती असं ठेवण्यात आलं.