क्रिकेट विश्वातील टॉप 10 आळशी, खराब फिल्डर्स; टिम इंडियाचे 3 महान खेळाडूदेखील यादीत

| Aug 25, 2024, 10:40 AM IST
1/11

क्रिकेट विश्वातील टॉप 10 आळशी, खराब फिल्डर्स; टिम इंडियाचे 3 महान खेळाडूदेखील यादीत

Cricket Top 10 Poor Fielders indian Cricketer Ganguly shrinath Ashwin

Cricket Top 10 Poor Fielders: क्रिकेटच्या इतिहासात धावा आणि विकेट्सच्या बाबतीत अनेक महान खेळाडू होऊन गेले. ज्यांना क्रिकेट चाहते नेहमी सलाम करतात. असे असले तरी ते त्यांच्यातील सुस्तपणा आणि खराब फिल्डिंगमुळेदेखील ओळखले जातात. यामुळे त्यांच्या नावावर नकोसा विक्रम असून त्यांच्या सुवर्ण कारकिर्दीवर तो डाग बनून राहिला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये असे 10 दिग्गज क्रिकेटपटू झाले आहेत ज्यांनी खूप धावा केल्या आणि विकेट्सही घेतल्या. पण क्षेत्ररक्षणाचा विषय आला तेव्हा त्यांना लाजिरवाण्या रेकॉर्डला सामोरे जावे लागलंय. या यादीत भारताचे तीन महान क्रिकेटपटूही आहेत.

2/11

शोएब अख्तर (पाकिस्तान)

Cricket Top 10 Poor Fielders indian Cricketer Ganguly shrinath Ashwin

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या बॉलिंगसमोर भलेभले बॅटर्स गुडघे टेकायचे. पण धावून बॉल पकडण्याच्या बाबतीत तो खूपच कमकुवत होता.

3/11

लसिथ मलिंगा (श्रीलंका)

Cricket Top 10 Poor Fielders indian Cricketer Ganguly shrinath Ashwin

श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा क्रिकेटच्या मैदानावर झेल घेताना खूपच कमजोर दिसला.

4/11

रविचंद्रन अश्विन (भारत)

Cricket Top 10 Poor Fielders indian Cricketer Ganguly shrinath Ashwin

फिरकीने बॅटर्सला गिरकी घ्यायला लावणारा अश्वीन चेंडू रोखताना कमकुवत दिसतो. त्याचे डायव्हिंगचे तंत्रही तितकेसे चांगले नसते.

5/11

इंझमाम उल हक (पाकिस्तान)

Cricket Top 10 Poor Fielders indian Cricketer Ganguly shrinath Ashwin

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक हा क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या सुस्त आणि खराब क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जायचा.

6/11

सौरव गांगुली (भारत)

Cricket Top 10 Poor Fielders indian Cricketer Ganguly shrinath Ashwin

बॅंटींग, कॅप्टन्सीच्या जोरावर टीम इंडियाला अनेक सामने जिंकून देणारा माजी कॅप्टन सौरभ गांगुली चेंडू अडवताना कमकुवत दिसायचा. त्याचे डायव्हिंगही विचित्र होते.

7/11

सईद अजमल (पाकिस्तान)

Cricket Top 10 Poor Fielders indian Cricketer Ganguly shrinath Ashwin

पाकिस्तानचा माजी ऑफस्पिनर सईद अजमल जलद धावू शकत नव्हता आणि त्याचे क्षेत्ररक्षणही अत्यंत खराब होते.

8/11

जवागल श्रीनाथ (भारत)

Cricket Top 10 Poor Fielders indian Cricketer Ganguly shrinath Ashwin

भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथची मैदानी क्षेत्ररक्षण फारशी चांगली नव्हती. खांद्याच्या दुखापतीनंतर त्याला चेंडू फेकण्याचे तंत्र बदलावे लागले. याचा फायदा घेत प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज जास्त धावा काढायचे.

9/11

मोर्ने मॉर्केल (दक्षिण आफ्रिका)

Cricket Top 10 Poor Fielders indian Cricketer Ganguly shrinath Ashwin

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलला त्याच्या उंचीमुळे क्षेत्ररक्षण करताना पटकन खाली वाकणे अवघड वाटायचे. यामुळे त्याने अनेकदा अतिरिक्त धावा दिल्या.

10/11

ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)

Cricket Top 10 Poor Fielders indian Cricketer Ganguly shrinath Ashwin

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राचे खराब क्षेत्ररक्षण अनेकदा समोर आले आहे.

11/11

अर्जुन रणतुंगा (श्रीलंका)

Cricket Top 10 Poor Fielders indian Cricketer Ganguly shrinath Ashwin

श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा फिल्डिंग करताना धावणे आणि चेंडू पकडण्यात कमकुवत होता.