Nepal Bus Accident : नेपाळ बस दुर्घटनेतील 27 जणांचे मृतदेह जळगावात दाखल, आता उरल्या फक्त आठवणी आणि फोटो, अनेक कुटुंब शोकसागरात
Nepal Bus Accident : नेपाळ बस दुर्घटना मृतांचा आकडा हा 30 वर पोहोचलाय. महाराष्ट्रातील जळगावा जिल्ह्यातील हे प्रवाशी पशुपतिनाथांच्या दर्शनासाठी निघाले असताना एका क्षणात होत्याच नव्हतं झालं.
1/11
2/11
3/11
4/11
5/11
माजी नगरसेवक सुधाकर जावळे, त्यांची पत्नी आणि त्यांच्या परिवारातील दोघांचा या अपघात जीव गेला आहे. सुधाकर जावळे यांचा मुलगा शुभमच्या मनाला चटका लागलाय. कारण त्याला आईशी शेवटच बोलता आलं नाही. झालं असं की, गुरुवारी रात्री वडील पोखराला पोहोचल्यावर त्यांनी शुभमला फोन केला होता. त्यावेळी आई बाहेर असल्याने त्याला बोलता आलं नाही. सकाळी आईला फोन करेल असं ठरवलं. पण नियतीचा खेळ माय लेकीच बोलणं होण्यापूर्वीच बसला अपघात झाला.
6/11
7/11
त्यातील एका प्रवाशांने सांगितलं की, रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पाहून पायाखालची वाळू सरकली. शुक्रवारी (23 ऑगस्ट) ला सकाळी पोखरामधून बस काठमांडूला निघाली. केसरवाणी टूर्सच्या दोन लक्झरी बसमधून प्रवास सुरु झाला. पहिली बस अंबुखैरेनी गावाच्या जवळपास दहा ते 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका हॉटेलवर चहापाण्यासाठी थांबली होती. दुसऱ्या बसची वाट पाहत असताना सव्वाअकरा ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान तुमच्या दुसऱ्या बसला अपघात झाला अशी माहिती दिली.
8/11
ही बातमी कळताच प्रवाशांवर आभाळच कोसळलं. प्रवाशी म्हणाली की, चहा-नाष्ट्याच्या प्लेट बाजूला ठेवत आम्ही सर्व आमच्या गाडीतील प्रवासी फटाफट लक्झरीत बसून घटनास्थळी गेलो. सुरुवातीला किरकोळ अपघात असावा असं वाटलं. एकमेकांना धीर देत आम्ही पोहोचलो. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्रात तब्बल 500 फूट खोल दरीत बस कोसळली होती.
9/11
समोरील दृश्यं पाहून आमच्यातील बऱ्याच जणांनी आणि महिलांनी हंबरडा फोडला. मन आणि डोकं सुन्न झालं होतं. काही सुचत नव्हत पण धीर गोळा करत. मदतीसाठी हालचाल सुरु केली. स्थानिक लोक मदतीला आलेत. कोणाच्याही मोबाईला रेंज नव्हती. मग कसा बसा एकाचा मोबाईलला रेंज आली जीवन सरोदे माझ्या मुलाला फोन केला आणि अपघाताची माहिती दिली आणि मदतीसाठी सांगितलं.
10/11