PHOTOS : एकेकाळी मॅगी खाऊन जगला, आता राहतोय 30 कोटींच्या घरात, हार्दिकची संपत्ती पाहून डोळे फिरतील

भारताचा स्टार ऑल राउंडर हार्दिक पंड्या आज त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. हार्दिकचा जन्म 11 ऑक्टोबर 1993 मध्ये गुजरातमधील एका सामान्य कुटुंबात झाला होता. एका मुलाखतीत हार्दिक म्हणाला होता की एकेकाळी त्याच्याकुटुंबाकडे क्रिकेट बॅट घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. तर अनेकदा त्याने फक्त मॅगी खाऊन स्वतःचे पोट भरले. मात्र हार्दिकने क्रिकेटमध्ये यश संपादन करून आता तो कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. 

Pooja Pawar | Oct 11, 2024, 13:02 PM IST
1/7

हार्दिक पंड्या हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे फार चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वीच त्याने पत्नी नताशा स्टेनकोविक सोबत घटस्फोट घेतला. हार्दिकने 2020 मध्ये नताशा सोबत विवाह केला होता. मात्र आता दोघे वेगळे झाले असून त्यांना अगस्थ्य नावाचा मुलगा सुद्धा आहे. 

2/7

Economic Times च्या रिपोर्टनुसार हार्दिक पंड्याची एकूण नेटवर्थ जवळपास 94 कोटींची आहे. हार्दिकची कमाई प्रामुख्याने टीम इंडिया, आयपीएलचे सामने, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि व्यावसायिक गुंतवणुकीतून होत असते. 

3/7

हार्दिक पंड्याकडे बीसीसीआयचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट असून त्याला यातून वर्षाला 5 कोटी रुपये मिळतात. वर्ष 2024 मध्ये आर अश्विन, के एल राहुल, शुभमन गिल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या सोबत हार्दिकलाही बीसीसीआयचे ग्रेड ए चं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. हार्दिक पंड्याला बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट ऐवजी प्रत्येक सामने खेळण्यासाठी सुद्धा वेगळी मॅच फी मिळते. एका टेस्ट सामन्यासाठी त्याला 15 लाख, वनडे सामन्यासाठी 6 लाख तर टी 20 साठी 3 लाखांची फी मिळते. 

4/7

2015 मध्ये हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 2022 मध्ये हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएलचे विजेतेपद सुद्धा पटकावले. 2024 च्या आयपीएलमध्ये हार्दिक पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये परतला. हार्दिकला मुंबई इंडियन्सकडून एका सीजनसाठी 18 कोटी रुपये मिळतात. तर आतापर्यंत आयपीएलचे १० सीजन खेळलेल्या हार्दिकने आयपीएलमधून 89.30 कोटी रुपये कमावले आहेत. 

5/7

हार्दिक पांड्याचे इंस्टाग्रामवर जवळपास 34.7 मिलियन फॉलोअर्स असून सोशल मीडियावर प्रमोशनल पोस्टद्वारे देखील हार्दिक मोठी कमाई करतो. हार्दिककडे Gulf Oil India, Souled Soul, Dream 11, Monster Energy आणि BoAtin सारख्या ब्रँडना एंडॉर्स करतो. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार हार्दिक मोठ्या प्रमोशनसाठी 1.5 कोटी ते 2 कोटी रुपये फी चार्ज करतो. क्रिकेट आणि जाहिराती वगळता हार्दिक पांड्याने वेगवेगळ्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे. यात Aretto , Yu Foodlabs , Bidzapp आणि  LenDenClub अशा कंपन्यांचा समावेश आहे. 

6/7

30 कोटींचं घर :

 हार्दिक पंड्याचं मुंबईत मोक्याच्या ठिकाणी आलिशान घर असून याची किंमत जवळपास 30 कोटी आहे. तर बडोदरामध्ये त्याचं पेंट हाऊस असून त्याची किंमत सुद्धा कोट्यवधीच्या घरात आहे.   

7/7

कार कलेक्शन :

हार्दिक पंड्याकडे एकापेक्षा एक आलिशान कार आहेत. हार्दिककडे 60.59 लाख रुपयांची Audi A6, 3.22 कोटींची Lamborghini Huracan EVO, 2.11 कोटींची Range Rover Vogue, 17.02 लाखांची Jeep Compass, 1.62 कोटींची Mercedes G-wagon, 6.22 कोटींची Rolls Royce आणि 1.93 कोटींची Porsche Cayenne या आलिशान कार आहेत.