PHOTO: चातकासमान वाट पाहतायत मुंबईकर; टीम इंडियांच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्हवर जनसागर

भारतीय संघ टी 20 वर्ल्ड कपची ट्रॉफी घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. आज संध्याकाळी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे असा रोड शो करण्यात येणार आहे. मुंबईकर मोठ्या संख्येने मरीन ड्राईव्हला उपस्थित आहेत. जनसमुदाय टीम इंडियाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. पाहा खास फोटो 

| Jul 05, 2024, 09:46 AM IST

भारतीय संघ टी 20 वर्ल्ड कपची ट्रॉफी घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. आज संध्याकाळी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे असा रोड शो करण्यात येणार आहे. मुंबईकर मोठ्या संख्येने मरीन ड्राईव्हला उपस्थित आहेत. जनसमुदाय टीम इंडियाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. पाहा खास फोटो 

1/7

भारतीय संघ मुंबई विमानतळावर पोहोचला असून आता मरीन ड्राईव्हकडे रवाना झाले आहेत. कोणत्याही क्षणी टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कपची ट्रॉफी घेऊन पोहचतील. 

2/7

भारतीय संघाची जर्सी घालून, हातात भारताचा झेंडा घेऊन चाहते मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावर उतरले आहेत. डोळ्यात प्राण आणून टीम इंडियाची वाट पाहताना दिसत आहेत. 

3/7

या फोटोंमध्ये पाहू शकता टीम इंडियासाठी मुंबईकर रस्त्यावर उतरले आहेत. अशावेळी ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे. 

4/7

क्रिकेटप्रेमी वेगवेगळे स्लोगन लिहिलेले पोस्टर घेऊन क्रिकेट प्लेअर्ससाठी सज्ज आहे. प्रत्येक चाहता आपल्या मनातील मॅसेज टीम इंडियापर्यंत पोहोचवू इच्छित आहे. यासाठी हा सगळा प्रयत्न केल्याचा दिसतोय.   

5/7

जुलै महिन्यातील पाऊस आणि ढगाळ वातावरण असताना मोठी गर्दी मरीन ड्राईव्हला उपस्थित आहे. क्रिकेट प्रेमी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. 

6/7

भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांची मेहनत फळाला आली. चाहत्यांनी या दोघांचे फ्लेक्स तयार केले आहेत. मरीन ड्राईव्हला मोठा जनसमुदाय टीम इंडियाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. 

7/7

चिमुकले देखील टीम इंडियाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.