कोकणातील घाटांचा राजा... कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणारा थराराक गगनबावडा घाट

कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणाऱ्या गगनबावडा घाटाची थराराक सफर. 

वनिता कांबळे | Jul 06, 2024, 22:47 PM IST

Gaganbawada Ghat Maharashtra : कधी कधी प्रवासही अमिस्मरणीय ठरतो तो सुंदर लोकेशनमुळे. महाराष्ट्रात एक असाच घाट रस्ता आहे तो कोकणातील घाटांचा राजा म्हणून ओळखला जातो. हा घाट म्हणजे  कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणारा थराराक गगनबावडा घाट. आयुष्यात एकदा तरी या सुंदर घाटातून प्रवास नक्की करा.

1/7

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोडणारा एक प्रमुख घाट म्हणजे करूळ किंवा गगनबावडा घाट. कोल्हापूरहून कणकवलीला जाणाऱ्या या रस्त्यावर हा वेड्यावाकड्या वळणांचा, अफाट निसर्गसौंदर्याचा घाट आहे.

2/7

कोल्हापूरहून गगनबावडा गाटचे अंतर  सुमारे 55 किलोमीटर. पायथ्यापर्यंत जाण्यासाठी कोल्हापूर, गगनबावडा येथून एसटी बसची सोय. खासगी वाहनानं जायचं असल्यास, रंकाळामार्गे करूळ घाटातून गगनगडाकडे जाता येतं.  

3/7

घाटातूनच गगनगडाचं होणारं दर्शन विलोभनीय असतं. गडापर्यंत जाण्याचा मार्गही तेवढाच आनंददायी आहे. 

4/7

पावसळ्यात या घाटातून प्रवास म्हणजे अविस्मरणीय अनभव आहे. 

5/7

गगनगड हा कोल्हापूरहून जवळ आणि कोकणाच्या मार्गावरचा महत्त्वाचा किल्ला असल्यामुळे तो संरक्षण आणि व्यापारीदृष्ट्याही महत्त्वाचा होता. 

6/7

निसर्गसौंदर्य आणि इतिहासाच्या पाऊलखुणा अनुभवण्यासाठी गगनगडाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.   

7/7

गगनबावडा घाटात समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार फूट उंचीवर गगनगड आहे.  गडावर कायमच सोसाट्याचा वारा आणि गार वातावरण अनुभवायला मिळतं.