Christmas 2023 च्या सुट्टीसाठी आयत्या वेळी कुठे जायचं? 'या' ठिकाणांना भेट द्या, होईल 'पैसा वसूल'

Best Place to Visit in Christmas : तुम्हीही या चार- पाच दिवसांच्या सुट्टीसाठी कुठे जायचं अशा विचारात आहात का? पर्याय सुचत नाहीयेत? 

Dec 21, 2023, 11:04 AM IST

Best Place to Visit in Christmas : ख्रिसमस, अर्थात नाताळ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा या नाताळसमाची उत्सुकता नोकरदार वर्गाला जरा जास्त आहे. कारण, म्हणजे लागून आलेल्या सुट्ट्या आणि चालून आलेली भटकंतीची संधी. 

 

1/7

Best Place to Visit in Christmas

Christmas 2023 Best Place to Visit on long weekend holidays

Best Place to Visit in Christmas : हरकत नाही, इथं पाहून घ्या ख्रिसमसच्या सुट्टीसाठी भटकंतीचे ऑफबिट पर्याय... 

2/7

साऊथ गोवा

Christmas 2023 Best Place to Visit on long weekend holidays

साऊथ गोवा - गोवा म्हटलं की गजबजलेले समुद्रकिनारे आणि पार्टीचा माहोलच डोळ्यांसमोर येतो. पण, या पठडीबाहेरही एक गोवा आहे आणि तो सर्वांनाच भावतो. तो म्हणजे या राज्याचा दक्षिण किनारपट्टी भाग अर्थात South Goa. पालोलिम, बेनोलिम, अगोंडा या आणि अशा किनाऱ्यांवर जाऊन तुम्ही काही निवांत क्षणांचा आनंद घेऊ शकता. 

3/7

कूर्ग

Christmas 2023 Best Place to Visit on long weekend holidays

कूर्ग- कर्नाटकातील एक कमाल गिरीस्थान म्हणजे कूर्ग. इथं येऊन तुम्ही धकाधकीच्या आयुष्यापासून बरेच दूर राहाल. भारतालं स्कॉटलंड अशी ओळख असणाऱ्या या कूर्गमध्ये तालाकावेरी, एबी फॉल्स, मंडलपट्टी पीक अशा अनेक ठिकाणांना आणि कॉफीच्या बागांना भेट देऊ शकता. किंबहुना तिथं राहूसुद्धा शकता. 

4/7

वाई / पाचगणी

Christmas 2023 Best Place to Visit on long weekend holidays

वाई / पाचगणी- महाबळेश्वरची गर्दी चुकवून तुम्ही यंदाच्या वर्षी मुबंईपासून पाच- सहा तासांच्या अंतरावर असणाऱ्या वाई किंवा पाचगणीला सहज भेट देऊ शकता. इथलं निसर्गसौंदर्य आणि झोंबणारी थंडी तुम्हाला वेगळ्याच दुनियेत घेऊन जाईल. 

5/7

वाराणासी

Christmas 2023 Best Place to Visit on long weekend holidays

वाराणासी - अतिशय अस्थिर अशा आयुष्याला एक स्थिरता आणि अध्यात्मिक अनुभव देण्याच्या विचारात असाल तर, वाराणासी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. गंगेच्या काठावर असणाऱ्या या ठिकाणी तुम्हाला अंतर्बाह्य मंत्रमुग्ध करणारा अनुभव मिळेल. 

6/7

मुन्नार आणि अॅलेप्पी

Christmas 2023 Best Place to Visit on long weekend holidays

मुन्नार आणि अॅलेप्पी - गिरीस्थानं आणि समुद्रकिनारे असा संमिश्र अनुभव घ्यायच्या विचारात असाल तर, केरळातील मुन्नार आणि अॅलेप्पी ही ठिकाणं तुमच्या सहलीसाठी उत्तम पर्याय ठरतील. 

7/7

नागपूर

Christmas 2023 Best Place to Visit on long weekend holidays

नागपूर - वर्षाचा शेवट कमाल जेवण, जंगलची सफारी असा काहीसा करायचा असेल तर, नागपूर तुमच्यासाठी उत्तम पर्याय असेल. इथं ताडोबाची सफारी करा, सावजीचा बेत करून चिकन मटणावर ताव मारा आणि संत्र्यांच्या बर्फीनं सहलीचा गोड शेवट करा. कसाय बेत?