Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणातील दुर्मिळ योगामुळे काही राशींना धनलाभ, तर 'या' राशींवर कोसळणार संकट

Horoscope Chandra Grahan : बौद्ध पौर्णिमेला चंद्रग्रहण हा दुर्मिळ आणि सुवर्ण योग जुळून आला आहे. आज सूर्य, बुध, गुरु आणि राहुचं मिलन होणार आहे. त्यामुळे तब्बल 130 वर्षांनी चतुर्ग्रही योग (Chaturgrahi Yog 2023) तयार झाला आहे.   

नेहा चौधरी | May 05, 2023, 10:28 AM IST

Chandra Grahan Zodiac Signs Horoscope : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आजचा दिवस खूप खास आहे. चंद्रग्रहणासोबत सिद्धी योगसोबतच व्यतिपात योग जुळू आला आहे. तर मेष राशीमध्ये गुरुचा वास आहे. याठिकाणी गुरु आणि राहुचं मिलन झालं आहे. त्यामुळे गजलक्ष्मी राजयोग जुळून आला. आता चंद्रग्रहण, बुद्ध पौर्णिमा (Chandra Grahan On Buddha Purnima) आणि गजलक्ष्मी योगासोबत चतुर्ग्रही योग जुळून आला आहे. 

1/13

चतुर्ग्रही योग!

तब्बल 130 वर्षांनी चंद्रग्रहण, बुद्ध पौर्णिमा आणि गजलक्ष्मी योगासोबत चतुर्ग्रही योग हा तयार झाला आहे. तर 12 वर्षांनंतर चंद्रग्रहणात सूर्य, बुध, गुरु आणि राहूचा चतुर्ग्रही योग जुळून आला आहे. त्यामुळे चंद्रग्रहणातील या योगायोगमुळे काही राशींचं भाग्य चंद्रासारखं उजळून घेणार असून त्यांना धनलाभ होणार आहे. तर काही राशींसाठी हा योग अशुभ आहे. त्यांचावर संकट कोसळण्याची शक्यता आहे. (chandra grahan Horoscope rashifal effect zodiac signs get  money Buddha Purnima Astrology Trending News today)  

2/13

मेष (Aries)

या राशीच्या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. महत्त्वाचे निर्णय वरिष्ठ्यांशी बोलून घ्या. कामात हलगर्जीपणा करुन नका, अन्यथा कायदेशीर कचाट्यात अडकण्याची भीती आहे.   

3/13

वृषभ (Taurus)

या लोकांनी नात्यांमध्ये वागताना बोलताना काळजी घ्यावी. कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. मालमत्ता आणि वडिलोपार्जित संपत्तीचा वाद पेटू शकतो. 

4/13

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण शुभ ठरणार आहे. नोकरीच्या ठिकाणी पगारवाढ आणि प्रमोशन मिळणार आहे. आर्थिक उत्पन्नाचे अनेक स्त्रोत वाढणार आहेत. 

5/13

कर्क (Cancer)

या राशीसाठी चंद्रग्रहण नुकसानदायक ठरणार आहे. या लोकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. मानसिक तणाव वाढणार आहे. 

6/13

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात यश मिळणार आहे. परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

7/13

कन्या (Virgo)

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. नवीन नोकरीचे योग आहेत. मुलांकडून आनंदवार्ता समजणार. कोर्टात सुरु असलेला वाद सुटणार आहे. 

8/13

तूळ (Libra)

आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. लवकरच प्रगतीचे मार्ग उघड होणार आहेत. हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे. 

9/13

वृश्चिक (Scorpio)

आर्थिक फटक्यासोबत मानसिक त्रास होणार आहे.  अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

10/13

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. मालमत्ता आणि वाहन खरेदी करु शकता. व्यवसायात चांगली प्रगती होणार आहे.   

11/13

मकर (Capricorn)

या राशीसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी मेहनतीचं फळ मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. 

12/13

कुंभ (Aquarius)

कामाला जास्त प्राधान्य द्याल. वैवाहिक जीवनाकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी निर्णय घेताना काळजी घ्या.   

13/13

मीन (Pisces)

या राशीची लोक नवीन उंची गाठताना कामाच्या ठिकाणी काळजी घ्या. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक गोष्टींबद्दल जागृत राहा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)