दगडूशेठ गणपतीचरणी 11 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य; पाहा मन मोहणारी आरास

Pune dagdusheth ganpati : सुरेख रंगसंगती, आखणी आणि त्यामध्ये असणआरं गणरायाचं रुप पाहतच राहावं असं वाटत आहे. 

May 05, 2023, 10:11 AM IST

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला केली जाणआरा सजावट कायमच लक्ष वेधते. यावेळी या मंदिराला सजावटीसाठी एक अनोखा पर्याय निवडण्यात आला असून, ही आरास सध्या सर्वांच्या मनाचा ठाव घेत आहे.

1/7

11 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य

Pune News dagdusheth Ganpati tender coconut decoration photos

'दगडूशेठ' गणपतीला 11 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ; पुष्टिपती विनायक जयंती (गणेशजन्म) निमित्त शहाळे महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं.

2/7

आरोग्यसंपन्न भारताकरीता आरास

Pune News dagdusheth Ganpati tender coconut decoration photos

बळीराजाच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारताकरीता आणि वैशाख वणव्यापासून सर्वांचे रक्षण व्हावे, याकरिता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात ११ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखवला गेला.

3/7

सभामंडपात शहाळ्यांची नयनरम्य आरास

Pune News dagdusheth Ganpati tender coconut decoration photos

यानिमित्तानं शुक्रवारी मंदिरात पूजा, गणेशयाग आणि अभिषेक झाला. इथं मंदिरातील गाभाऱ्यासोबतच सभामंडपात शहाळ्यांची नयनरम्य आरास करण्यात आली होती.

4/7

श्रीगणेश पुराण

Pune News dagdusheth Ganpati tender coconut decoration photos

सजावटीसाठी बाप्पाच्या पुष्टीपती विनायक अवताराचा  संदर्भ घेण्यात आला. ज्याचा उल्लेख श्रीगणेश पुराण आणि मुद्गल पुराण या ग्रंथामध्ये आढळतो.

5/7

या अवतारामध्ये पुष्टी...

Pune News dagdusheth Ganpati tender coconut decoration photos

या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णुंच्या घरी त्याची मुलगी म्हणून जन्म घेते व श्री गणेश हे विनायक स्वरुपात शंकर-पार्वती यांच्या घरी जन्म घेतात. दुर्मती राक्षसाने पृथ्वी-पाताळ-स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालवलेला असतो.

6/7

श्री गणेश

Pune News dagdusheth Ganpati tender coconut decoration photos

त्याचा नित्पात करण्याकरिता पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेश विनायक अवतारामध्ये प्रगट होऊन दुर्मती राक्षसाचा वध करतात. त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा करतात.

7/7

पुष्टिपती विनायक

Pune News dagdusheth Ganpati tender coconut decoration photos

वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो. वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, याच हेतूनं हा महानैवेद्य अर्पण केला जातो. दुसऱ्या दिवशी ही शहाळी ससून रुग्णालयाती रुग्णांना प्रसाद स्वरुपात दिली जातात.