Chanakya Niti : श्रीमंत होण्यासाठी 'या' 3 गोष्टींवर खर्च करा! पैशांचा ओघ वाढेल...

Chanakya Niti : श्रीमंत होण्यासाठी काय कराला हवं याबद्दल आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रात सांगितलंय. जर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्यास तुमच्याकडे पैशांचा ओघ वाढणार. 

| Dec 05, 2024, 11:18 AM IST
1/7

चाणक्य यांनी नीती शास्त्रात सांगितलंय की, दान हे सर्वोत्कृष्ट कर्म मानला जातो. लोकांनी त्यांचा स्थितीनुसार दान केलं पाहिजे, असं सांगण्यात आलंय. 

2/7

आचार्य चाणक्य नीती शास्त्रात की, जर कोणी दान केले तर त्यांची संपत्ती कधी कमी होत नाही. त्यांच्याकडे कधीही पैशांची कमतरता होत नाही. 

3/7

आचार्य चाणक्य सांगतात की, पैशाशी संबंधित गरीब किंवा गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी कधीही मागे पुढे पाहू नये. 

4/7

चाणक्य सांगतात की, गरीब किंवा गरजू व्यक्तींना अन्न, कपडे आणि औषध यासारख्या गोष्टींवर पैसे खर्च करण्यापूर्वी कसालाही विचार करु नये. 

5/7

आचार्य चाणक्य नीती शास्त्रात सांगतात की, धार्मिक कामांसाठी पैसा खर्च करण्यात कधीही कंजूसपणा करु नयेत. 

6/7

आचार्य सांगतात की, धार्मिक गोष्टींसाठी दान करणारा मनुष्य कायम श्रीमंत राहतो. त्याच्या आयुष्यात आनंदच आनंद असतो. 

7/7

दान, धार्मिक कामात पैसा त्यासोबत सामाजिक कार्यातही पैसा खर्च करताना कोणताही विचार करु नका. चाणक्य म्हणतात की समाजाप्रती प्रत्येक व्यक्तीची जिम्मेदारी असते. त्यामुळे योग्य दान केल्यास तुमचं नुकसान नाही तर तुमचा त्यातून फायदाच होणार आहे. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)