Career Tips: 'या' कोर्समुळे बदलेल तुमचं संपूर्ण जीवन, भविष्य राहील सुरक्षित

बारावीनंतर कोणता कोर्स करायचा?  याचा विचार विद्यार्थी करु लागतात. त्यांच्यासाठी महत्वाचे पर्याय जाणून घेऊया.

Pravin Dabholkar | May 11, 2024, 19:35 PM IST

Career Tips: बारावीनंतर कोणता कोर्स करायचा?  याचा विचार विद्यार्थी करु लागतात. त्यांच्यासाठी महत्वाचे पर्याय जाणून घेऊया.

1/10

Career Tips: 'या' कोर्समुळे बदलेल तुमचं संपूर्ण जीवन, भविष्य राहील सुरक्षित

Career Tips Life Changing Course MBA CA MBBS Marathi News

Life Changing Course: बारावीचा निकाल लागल्यावर अनेक विद्यार्थी करिअरच्या वाटा शोधू लागतात. शिक्षण सुरु असताना एका टप्प्यावर आपल्याला करिअरची चिंता वाटू लागते. भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून आता कोणता कोर्स करायचा?  याचा विचार विद्यार्थी करु लागतात.

2/10

करिअर योग्य दिशेने

Career Tips Life Changing Course MBA CA MBBS Marathi News

काही विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडून किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून चांगले मार्गदर्शन मिळते. यामुळे त्यांचे करिअर योग्य दिशेने दाते. पण सर्वच तरुणांच्या आयुष्यात हा पर्याय उपलब्ध नसतो. 

3/10

भविष्य घडवण्यात मदत

Career Tips Life Changing Course MBA CA MBBS Marathi News

कारण अनेक विद्यार्थ्यांचे पालक कमी शिकलेले असतात किंवा त्यांना इतर अभ्यासक्रमांबद्दल फारशी माहिती नसते. अशावेळी काय करायचं? हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे भविष्य घडवण्यात मदत करू शकणाऱ्या कोर्सबद्दल जाणून घेऊया.

4/10

मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन

Career Tips Life Changing Course MBA CA MBBS Marathi News

प्रतिष्ठित अभ्यासक्रमांच्या यादीत एमबीएचे नाव नक्कीच पहिले येईल. एमबीएचा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या अनेक संस्था आहेत. तुम्ही एमबीए करण्याचा विचार करत असाल तर आयआयएमसारख्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधून करणं उत्तम ठरु शकतं.

5/10

भविष्यात चांगले पॅकेज

Career Tips Life Changing Course MBA CA MBBS Marathi News

जर तुम्ही आयआयएम सारख्या नामांकित संस्थेतून एमबीए केले तर भविष्यात तुम्हाला पॅकेज देखील चांगले मिळेल. असे असले तरी आयआयएममध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला चांगल्या टक्केवारीसह उत्तीर्ण व्हावे लागेल. 

6/10

कॉमर्समधून बारावी

Career Tips Life Changing Course MBA CA MBBS Marathi News

एमबीए करण्यासाठी तुम्ही बारावी कोणत्या स्ट्रीममधून करायची? असा प्रश्न तुमच्या मनात आहे का? तर कोणत्याही स्ट्रीममधून उत्तीर्ण असाल तरी एमबीए करू शकता. पण कॉमर्समधून बारावी केली असेल तर ते अधिक फायदेशीर ठरु शकते.

7/10

एमबीबीएस

Career Tips Life Changing Course MBA CA MBBS Marathi News

बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी म्हणजेच एमबीबीस पदवी मिळवून तुम्ही रुग्णसेवा करु शकता. डॉक्टर हे या पृथ्वीतलावर देवाचे दुसरे रूप मानले जाते. डॉक्टर लोकांचे प्राण वाचवतात. त्यामुळे अनेक लहान मुलांना भविष्यात डॉक्टर बनण्याची इच्छा असते.

8/10

NEET परीक्षेत चांगली रँक

Career Tips Life Changing Course MBA CA MBBS Marathi News

आयुष्यात चांगला अभ्यास करून डॉक्टर झालात तर दरमहा लाखो रुपये कमवू शकता. डॉक्टर बनण्यासाठी काय करावे लागते हे समजून घेऊया. डॉक्टर होण्यासाठी एमबीबीएस करावे लागते. एमबीबीएसमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी तुम्हाला NEET परीक्षेत चांगली रँक मिळवावी लागेल.

9/10

चार्टर्ड अकाउंटंट (CA)

Career Tips Life Changing Course MBA CA MBBS Marathi News

सीए म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट कोर्स देखील प्रतिष्ठीत कोर्स मानला जातो. सीए करुन तुम्ही चांगली कमाई करू शकता. चार्टर्ड अकाउंटंट कर भरण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे जर तुम्ही सीए कोर्स पूर्ण केलात तर तुमचे भविष्य सुरक्षित होते. 

10/10

मोठ्या कंपन्यांकडून नोकरी

सीए केल्यानंतर तुम्हाला मोठ्या कंपन्यांकडून नोकरी मिळू शकते. कंपन्या सीएला करोडोंचे पॅकेज देतात. सीए बनण्यासाठी तुम्हाला सीएची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.