अक्षय्य तृतीया 2018: एक रुपयांत खरेदी करा २४ कॅरेट सोने

Apr 18, 2018, 15:33 PM IST
1/7

Buy gold at rupee 1 only

Buy gold at rupee 1 only

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानली जाते., या दिवशी सोन्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते. मात्र सध्याचे वाढलेले दर पाहता अनेकांनी सोने खरेदी टाळलीये. काहीजण गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करतात. या दिवशी विक्री वाढल्याने सोन्याचे दरही वाढतात. तुम्हाला जर आजच्या दिवशी सोने खरेदी करायचेयस तर तुम्हाला एका रुपयांत सोने मिळू शकते आणि तेही २४ कॅरेट. 

2/7

Paytm offer gold at rupee 1 only

Paytm offer gold at rupee 1 only

अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने तुम्हाला एक रुपयांत सोने खरेदीची सुवर्णसंधी मिळतेय. आता प्रश्न हा आहे की कुठून आणि कसे खरेदी करणारे हे स्वस्त लोने, अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर पेटीएमने एमएमटीसी पॅम्पसोबत २४ कॅरेट सोने खरेदी-विक्रीची नवी सुविधा सुरु केलीये. आज तुम्ही येथून हवे तितके सोने खरेदी करु शकता. 

3/7

Paytm offer Digital Gold at rupee 1 only

Paytm offer Digital Gold at rupee 1 only

पेटीएम गोल्ड तुम्हाला १ रुपयांत सोने खरेदी करण्याची संधी देत आहे. खरंतर पेटीएमने डिजीटल गोल्ड या नावाने वेल्थ मॅनेजमेंटची नवी योजना सुरु केलीये. या योजनेंतर्गत तुम्ही वर्षभर कोणत्याही दिवशी डिजीटल पद्धतीने सोने खरेदी करु शकता. तुम्ही पेटीएमच्या मोबाईळ अॅपनेही खरेदी करु शकता. खरेदी दोन्ही प्रकारे रुपये आणि वजनानेही होऊ शकते. दरम्यान वजनावर सोने खरेदी करत असाल तुम्हाला बाजाराच्या किंमतीने सोनेची किंमत द्यावी लागेल. 

4/7

Bullion India offers Gold at rupees 1

Bullion India offers Gold at rupees 1

पेटीएम गोल्डशिवाय बुलियन इंडियाही तुम्हाला या प्रकारची सेवा देते. येथे तुम्ही कमीत कमी एक रुपयांत सोने खरेदी करु शकता. यासाठी तुम्हाला बुलियन इंडियामध्ये खाते खोलावे लागेल. पेटीएम गोल्डप्रमाणे बुलियन इंडियाही तुम्हाला सोन्याची होम डिलीव्हरी देते. 

5/7

अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने तुम्ही हप्त्यावरही सोने खरेदी करु शकता. मुथूट फायनान्स आणि तनिष्क ज्वेलर्ससह अनेक ज्वेलर ही संधी ग्राहकांना देत आहेत. तनिष्क आपल्या गोल्ड हार्वेस्ट स्कीमअंतर्गत इएमआयवर सोने देत आहे.   

6/7

Muthoot Finance offers Gold on EMI

Muthoot Finance offers Gold on EMI

अन्य ज्वेलर्सप्रमाणे मुथूट फायनान्सने स्वर्णवर्षम स्कीम सुरु केलीये. या स्कीमअंतर्गत तुम्ही इएमआयवर सोने खरेदी करु शकता. मुथूट फायनान्समधून इएमआयवरुन सोने खरेदीचा ऑप्शन तुमच्याकडे आहे. येथे तुम्ही अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने ज्वेलरीव्यतिरिक्त इतर वस्तूही इएमआयवर खरेदी करु शकता. मात्र इएमआयवर खरेदी करताना अटी जरुर वाचा त्यानंतरच सोने खरेदी करा.

7/7

Invest in Gold ETF on Akshaya Tritiya 2018

Invest in Gold ETF on Akshaya Tritiya 2018

काही लोक अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करतात. अशा लोकांसाठी ETF हा चांगला पर्याय आहे. तुम्हाला जर फिजिकल गोल्ड खरेदी करायचे नाहीये तर तुम्ही गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करु शकता. गोल्ड इटीएफ पेपर आणि इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये असते. गोल्ड इटीएफमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्ही टॅक्सचा फायदा मिळवू शकता. गोल्ड इटीएफ तुम्ही डिमॅट अथवा ब्रोकरकडून खरेदी करु शकता.