Budget 2021: Income Tax वाचविण्याचे हे 8 पर्याय, जाणून घ्या सविस्तर

जास्त आयकर भरायला लागू नये किंवा तो भरला गेला नाही तर मोठा फटका बसतो. मात्र आयकर वाचवण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे आपल्याला बरेचदा माहिती नसतं. काहीवेळा माहीत असून ताण आल्यानं विसरून जातो. आपला आयकर वाचवण्यासाठी काही खास ट्रिक्स सांगणार आहोत.   

Jan 31, 2021, 20:19 PM IST
1/10

2/10

डोनेशन (80G)

डोनेशन (80G)

जर आपण दान केलं आणि त्याच्या पावत्या जपून ठेवल्या तर आयकराच्या नियम 80G नुसार आपला टॅक्स वाचवू शकता. हा फक्त ते दान करताना चॅरिटेबल संस्थेलाच दान करता येतं हे लक्षात ठेवून दान करावं. यामध्ये कोणत्या संस्था येतात त्याची माहिती घेणं गरजेचं आहे.  

3/10

विशेष आजारावर मिळू शकते सूट : कॅन्सर, न्यूरोलॉजीकल आजार, एड्स सारख्या मोठ्या आणि गंभीर आजारांवर आयकरातून सूट मिळू शकते. सेक्शन 80DDB अंतर्गत 40,000 ही सूट मिळते. तर सीनियर सिटिजन्ससाठी याची मुदत वाढवून 1 लाख करण्यात आली आहे.

4/10

जर तुम्ही एखाद्या दिव्यांगची काळजी घेतली तर कलम 80 डीडी अंतर्गत त्यावर होणाऱ्या खर्चावर हक्क सांगितला जाऊ शकतो. ती अपंग व्यक्ती कुटुंबाचा कोणताही सदस्य असू शकते, जसे की पालक, मुले किंवा भावंडे. तुम्हाला किती करात सूट मिळेल हे पीडब्ल्यूडीच्या अपंगत्वावर अवलंबून आहे. 75,000 ते 1.25 लाख रुपयांपर्यंत कर सूट आहे.  

5/10

सेविंग अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याजावर जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. उदा. तुमचे 4 बँक अकाऊंट आहेत. त्यावर 15 हजार व्याज येत असेल तर 10 हजारात सूट मिळू शकते वरच्या 5000 रुपयांवर कर लागू शकतो. 

6/10

एचआरए (80GG)

एचआरए (80GG)

तुम्ही पगारदार असाल आणि आपली कंपनी एचआरए देत असेल तर आपल्याला भाड्यावर कराची सूट मिळेल. परंतु आपणास एचआरए न मिळाल्यास आपण घराच्या भाड्यावर कर सूट मागू शकत नाही. 

7/10

(80EE)

 (80EE)

पहिलं घर खऱेदी करणाऱ्या नागरिकाच्या होमलोनवरील व्याजदरावर अतिरिक्त सूट मिळते. पण त्या व्यक्तीच्या नावावर दुसरं कोणतंच घर असताकामा नये. 50 हजाररुपयांपर्यंत अतिरिक्त टॅक्स क्लेम करता येतो. तर अडीच लाखांपर्यंत ही सूट मिळू शकते. 

8/10

होम लोन रिपेमेंटवर आयकरमध्ये सूट मिळण्यासाठी क्लेम करू शकता. 80C अंतर्गत1.5 लाख रुपयांपर्यंत ही सूट आपल्याला मिळवता येऊ शकते. तर जास्तीतजास्त आपण 2 लाखांपर्यंत क्लेम करू शकता.   

9/10

एजुकेशन लोन (80E)

एजुकेशन लोन (80E)

तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं असेल तर रिपेमेंटवर आपल्याला सूट मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. 

10/10

हेल्थ इंश्योरेंस (80D)

हेल्थ इंश्योरेंस (80D)

तुम्ही हेल्थ इन्शुरन्सअंतर्गत त्याच्या प्रीमीयमवर क्लेम करू शकता. त्यासाठी 80D अंतर्गत किती सूट मिळू शकते ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला 25 हजार ते 1 लाखांपर्यंत क्लेम करता येऊ शकतो.