'या' चित्रपटाचं बजेट इतकं कमी होतं की विद्या बालन गाडीतच बदलायची कपडे! पण Box Office वर केली छप्परफाड कमाई

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही गाजलेल्या कलाकारांपैकी एक आहे. विद्या बालननं तिच्या अभिनयाची जादू सगळ्यांवर केली आहे. विद्या बाललनं तिच्या करिअरची सुरुवात ही छोट्या पडद्यावरून केल्यानंतर मोठ्या पडद्यापर्यंत मजल मारली आहे. तिनं तिच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. विद्या बालनचा पहिला चित्रपट 'परिणीता' होता. त्यात तिच्यासोबत सैफ अली खान आणि संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकेत होते. तिचा पहिलाच चित्रपट हिट होता आणि तिला इंडस्ट्रीपासून चाहत्यांच्या मनात स्वत: चे स्थान निर्माण केले. 

| Oct 05, 2024, 18:02 PM IST
1/7

विद्याच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'कहानी'. नुकतेच दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी या चित्रपटांसंबंधीत काही गोष्टींचे धक्कादायक खुलासे केले आहेत. विद्याचा हा थ्रिलर चित्रपट सगळ्यात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. खरंतर, या चित्रपटाचं बजेट हे खूप कमी होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजॉय घोषनं केलं होतं. हा चित्रपट 12 वर्षांपूर्वी अर्थात 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि सुजॉय घोष यांच्या करियरसाठी एक मोठा टर्निंग पॉईंट ठरला होता. 

2/7

सुजॉय यांनी कमी बजेटमध्ये खूप सुंदर आणि सस्पेंस असलेला हा चित्रपट बनवला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 'झंकार बीट्स' आणि 'अलादीन' सारख्या चित्रपटांना यश मिळाल्यानंतर घोष यांनी 'कहानी' मध्ये त्यांचं लक्ष केंद्रीत केलं. 

3/7

या चित्रपटाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं, तर या चित्रपटानं जबदरस्त कमाई देखील केली. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचं बजेट हे 15 कोटी होतं तर या चित्रपटानं जगभरात 79.20 कोटींची कमाई केली होती.   

4/7

सुजॉय यांनी एका मुलाखती दरम्यान, सांगितलं की या चित्रपटाचं बजेट इतकं कमी होतं की विद्या बालनकडे व्हॅनिटी व्हॅन देखील नव्हती. अशात ती तिच्या गाडीतच कपडे बदलायची. तरी सुद्धा विद्यानं संपूर्ण चित्रपटात चांगलं काम केलं आणि चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. 

5/7

हा चित्रपट आजही विद्या बालनच्या करिअरचा सगळ्यात हिट चित्रपटांमध्ये मोजला जातो आणि तिच्या कामाची चांगली स्तुती देखील झाली. या चित्रपटाला बनवता दिग्दर्शकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. खरंतर, चित्रपटात दिसणाऱ्या महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांविषयी बोलताना ते म्हणाले, यात काम करणाऱ्या कलाकारांना ज्या सुविधा मिळायला हव्या होत्या त्या त्यांना देऊ शकल्या नाही. आर्थित संकटांमुळे विद्याला अनेकदा रस्त्यावर उभी असलेल्या टोयोटो इनोव्हा गाडीत कपडे बदलावे लागले. तर तिच्या प्रायव्हसीसाठी काळ्या कपड्यानं गाडीला झाकण्यात येत होतं.   

6/7

'कहानी' आधी सुजॉय घोष यांचे एकामागे एक असे तीन चित्रपट फ्लॉप झाले आणि याविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की 'अलादीन' च्या अपयशानंतर विद्या बालननं या चित्रपटात काम करण्यास नकार देऊ शकत होती. पण तिनं पाहिलं की त्या पिढीचे कलाकार, जसे अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान त्यांच्या कामाला घेऊन खूप प्रामाणिक होते. जर त्यांनी काही करण्याचं वचन दिलं तर पूर्ण करायचे. विद्या देखील अशा प्रकारची एक अभिनेत्री आहे. 12 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात परमब्रत चॅटर्जी, इंद्रनील सेनगुप्ता, नवाजुद्दीन सिद्दीकी, धृतिमान चॅटर्जी सारखे कलाकार दिसले होते.   

7/7

विद्याच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती सगळ्यात शेवटी प्रदर्शित झालेल्या 'दो और दो प्यार' मध्ये दिसली होती. ज्यात तिच्यासोबत प्रतीक गांधी, इलियाना डिक्रुझ आणि सेंथिल राममूर्तिसारखे कलाकार दिसले. तर विद्या लवकरच हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या निमित्तानं प्रदर्शित होणार आहे. या आधी विद्या 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैया' या चित्रपटात दिसली होती.