कधी आणि कसा होईल मृत्यू? अमेरिकेच्या डाँक्टरांनी शोधलेल्या टूलमध्ये असं नेमकं काय?

मृत्यू कोणाला चुकला नाही. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी मरणारच असतो. मृत्यू हे अटळ सत्य आहे. ते कोणी नाकारु शकत नाही. कधी? कसा होईल हे कोणाला सांगता येत नाही. पण आता अमेरिकन डॉक्टरांनी याचा शोध लागल्याचा दावा केलाय.

| Oct 05, 2024, 19:50 PM IST

Tools About Death: मृत्यू कोणाला चुकला नाही. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी मरणारच असतो. मृत्यू हे अटळ सत्य आहे. ते कोणी नाकारु शकत नाही. कधी? कसा होईल हे कोणाला सांगता येत नाही. पण आता अमेरिकन डॉक्टरांनी याचा शोध लागल्याचा दावा केलाय.

1/9

कधी आणि कसा होईल मृत्यू? अमेरिकेच्या डाँक्टरांनी शोधलेल्या टूलमध्ये असं नेमकं काय?

American doctors invented Tool inform about Death Marathi News

Tools About Death: मृत्यू कोणाला चुकला नाही. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी मरणारच असतो. मृत्यू हे अटळ सत्य आहे. ते कोणी नाकारु शकत नाही. कधी? कसा होईल हे कोणाला सांगता येत नाही. पण आता अमेरिकन डॉक्टरांनी याचा शोध लागल्याचा दावा केलाय.

2/9

प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान

American doctors invented Tool inform about Death Marathi News

या जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे आणि जन्माला येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान असते. प्रत्येक गोष्टीच्या सत्यतेवरून पडदा हटवत शास्त्रज्ञ आज अशा टप्प्यावर पोहोचले आहेत की ते मृत्यूचे अचूक भाकीत करण्याचा दावा करत आहेत.

3/9

वयाचा प्रभाव प्रत्येकावर वेगवेगळा

American doctors invented Tool inform about Death Marathi News

वयाचा प्रभाव प्रत्येकावर वेगवेगळा दिसतो यात शंका नाही. चांगल्या जनुकांमुळे काही लोकांचे वय हळूहळू वाढताना दिसते, तर काही लोक चुकीच्या जीवनशैलीच्या सवयींमुळे वयाच्या आधीच म्हातारे झालेले दिसतात.

4/9

वय किती वेगाने वाढते?

American doctors invented Tool inform about Death Marathi News

इतकेच नाही तर कमी झोपेची सवय, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, धुम्रपान, मद्यपान आणि चिंता या गोष्टीही डीएनएवर पीरणाम करतात. एखाद्या व्यक्तीचे वय किती वेगाने वाढते आहे याचा अंदाज लावला जाऊ शकेल, हे बदल मोजण्याचे मार्ग  शास्त्रज्ञांनी शोधले आहेत.

5/9

मृत्यूची वेळ सांगणार टूल

American doctors invented Tool inform about Death Marathi News

संशोधकांनी एपिजेनेटिक घड्याळ नावाचे एक साधन विकसित केले आहे. जे जीवनशैलीच्या सवयींमुळे डीएनएमधील बदलांचा मागोवा घेण्यास रक्त पेशींना मदत करते. ही एक कठीण प्रक्रिया आहे. यासाठी गेली 10 वर्षे काम सुरु होते.

6/9

घड्याळाची नवीन आवृत्ती

American doctors invented Tool inform about Death Marathi News

त्यामुळे आता अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या एका गटाने या घड्याळाची नवीन आवृत्ती चीकएज तयार केली आहे. जे गालांच्या आतील पेशींचा वापर करून डीएनएमधील बदलांची माहिती देते. हे खूप सोपे आहे.

7/9

मृत्यूचे नेमके कारण कळेल

American doctors invented Tool inform about Death Marathi News

फ्रंटियर्स इन एजिंगमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील अभ्यासात, संशोधकांनी नोंदवले की गालाचे वय मृत्यूच्या धोक्याचा अचूक अंदाज लावू शकते.

8/9

कोणी किती काळ जगू शकत?

American doctors invented Tool inform about Death Marathi News

आम्हाला विशिष्ट मार्कर सापडले आहेत. कोणी किती काळ जगू शकतं याच्याशी जवळून जोडलेले आहेत, अशी माहिती संशोधनाचे नेतृत्व करणारे डॉ. मॅक्सिम शोकिरेव्ह यांनी दिली.

9/9

डिस्क्लेमर

American doctors invented Tool inform about Death Marathi News

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)