हा सिंह माणसासोबत जेवतो, झोपतो... एवढंच नाही तर गाडीतूनही फिरतो...

माणूस आणि प्राण्यांमधील प्रेमाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. अनेक जण आपल्या घरातील प्राण्यांवर जीवापाड प्रेम करतात. परंतु कधी जंगलाचा राजा सिंहाला एका माणसासोबत राहताना ऐकलं का? हा सिंह माणसाच्या इतका जवळ आहे की, तो त्याच्यासोबत जेवतो, आंघोळ करतो, झोपतो...एवढंच नाही तर ते दोघे एकत्र गाडीतून फिरायलाही जातात.

May 11, 2019, 15:47 PM IST
1/4

पाकिस्तानातील कराची येथे राहणाऱ्या दोन भावांनी सिंहाला पाळले आहे. हमजा आणि हसन हुसैन यांनी या सिंहाला तो दोन महिन्यांचा असताना घरी आणले होते.

2/4

या दोन भावांनी त्यांच्या सिंहाचं नाव सिम्बा ठेवलं आहे. या सिंहाची आई त्याला दूध पाजू शकत नव्हती त्यामुळे या दोघांनी त्याला घरी आणण्याचा निर्णय घेतला असल्याचं हसनने सांगितलं. 'आम्ही त्याला आमच्या भावाप्रमाणे सांभाळत असून तो आता २६ महिन्यांचा झाला' असल्याचं त्याने सांगितलं.   

3/4

तो आमच्या मुलासारखाच आहे. सिम्बा कोणाला ओळखत असेल तर ठिक परंतु एखादी नवीन व्यक्ती आल्यास तो त्यांच्यासोबत खेळायचा प्रयत्न करतो. कोणी सिम्बाला बघून कोणी ओरडलं तर तो कदाचित चावू शकत असल्याचं हमजाने म्हटलंय. तो आमच्या घरातील सदस्यासारखाच असून आम्ही त्याचे ट्रूथब्रशने दात घासतो, त्याला अंघोळ घालत असल्याचंही हमजाने सांगितलं.

4/4

सिम्बाला चिकन आवडत नसून त्याला दररोज ५ किलो मटन खायला लागत असल्याचं हसनने म्हटलंय. हसन आता या सिम्बासाठी एका मादी जोडीदाराच्या शोधात आहे. सिम्बासाठी स्थानिक पातळीवर जर कोणी मादी जोडीदार मिळाला नाही तर दक्षिण अफ्रिकातून आयात करणार असल्याचं त्याने सांगितलं.