Mahakumbh 2025 Grah Yog : पौष पौर्णिमा, महाकुंभला 144 वर्षांनंतर अद्भूत संयोग! 3 राशींना होणार आकस्मिक धनलाभ

Paush Purnima 2025 : पौष पौर्णिमेपासून सोमवारी 13 जानेवारी 2025 पासून महाकुंभ सुरू होतोय. या उत्सवासाठी देशभर आणि जगभरातून ऋषी-भक्त पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी येतात. ज्योतिष शास्त्रानुसार या वेळी 144 वर्षांनंतर महाकुंभावर एक अद्भुत योगायोग घडून आलाय. 

| Jan 12, 2025, 22:20 PM IST
1/7

महाकुंभ 13 जानेवारीपासून सुरू होणार असून 26 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. यंदाचा 2025 चा महाकुंभ खूप खास असून हा महाकुंभ केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे. 

2/7

यावेळी 144 वर्षांनंतर महाकुंभावर एक अद्भुत योगायोग घडून आलाय. ज्योतिष शास्त्रानुसार 144 वर्षांनंतर महाकुंभावर सूर्य, चंद्र, शनि आणि गुरू यांची एकत्र स्थिती शुभ असणार आहे. 

3/7

यादिवशी पौष पौर्णिमा, रवि योग आणि भाद्रव योगही आहे. हे संयोजन समुद्र मंथनाच्या वेळी देखील घडले होतं, म्हणून ते अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं गेलंय. देवगुरु गुरु वृषभ राशीत आणि ग्रहांचा राजा सूर्य मकर राशीत असतो तेव्हा महाकुंभ होतो. या काळात गुरुची दृष्टी सूर्यावर पडते, त्यामुळे हा काळ अतिशय शुभ मानला गेलाय. 

4/7

दर 12 वर्षांनी, जेव्हा गुरु 12 राशींचा प्रवास पूर्ण करतो आणि वृषभ राशीत परततो, तेव्हा महाकुंभ असतो. पण जेव्हा हे चक्र 12 वेळा पूर्ण होते, म्हणजे 144 वर्षांनी, तेव्हा पूर्ण महाकुंभ असतो. अशा स्थितीत 144 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोगामुळे काही राशींवर भाग्यशाली ठरणार आहे. 

5/7

मेष रास

ज्योतिष शास्त्रानुसार यावेळी महाकुंभ दरम्यान मेष राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. मोठी उद्दिष्टे साध्य करण्यात यश मिळणार आहे. व्यवसायातही मोठी प्रगती होणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर वेळ अगदी अनुकूल असणार आहे. या काळात मेष राशीच्या लोकांना सर्व प्रकारचे सुख लाभणार आहे. 

6/7

सिंह रास

या राशीच्या लोकांनाही या काळात लाभ होणार आहे. तुम्ही आत्मविश्वास आणि उर्जेने परिपूर्ण राहणार आहात. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश प्राप्त होईल. प्रलंबित पैसे परत मिळणार आहे. नोकरीत प्रगती होणार आहे. नोकरदार लोकांना इच्छित बदली किंवा पगारात वाढ मिळणार आहे. व्यवसायातही चांगला नफा तुमची वाट पाहत आहे. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सौहार्दपूर्ण राहणार आहे. काही विशेष कामात यश मिळेल. 

7/7

मकर रास

या राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्यवान ठरणार आहे. मकर राशीच्या लोकांना शनिदेवाचा विशेष कृपा असणार आहे. आध्यात्मिक शक्ती वाढणार आहे. व्यवसायात यश प्राप्त होणार आहे. जीवनात मोठे बदल पाहिला मिळतील. नोकरदारांना लाभ मिळणार आहे. आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. मानसिक तणावातून आराम मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)