Rolls Royce च्या सर्वात स्वस्त कारची किंमत किती माहितीये का? 50 Thar आणि 100 Wagon R विकत घ्याल

भारतीय बाजारपेठेत रोल्स रॉयस, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू आणि ऑडीसह अनेक लक्झरी गाड्या उपलब्ध आहेत. पण या ब्रँडच्या सर्वात स्वस्त कारची किंमत किती हे तुम्हाला माहिती आहे का?  

| Jan 13, 2025, 20:17 PM IST

भारतीय बाजारपेठेत रोल्स रॉयस, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू आणि ऑडीसह अनेक लक्झरी गाड्या उपलब्ध आहेत. पण या ब्रँडच्या सर्वात स्वस्त कारची किंमत किती हे तुम्हाला माहिती आहे का?

 

1/12

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र सध्या चांगली प्रगती करत आहे. छोट्या आणि परवडणाऱ्या कारसह आलिशान गाड्यांची विक्रीही सातत्याने वाढत आहे.   

2/12

भारतीय बाजारपेठेत रोल्स रॉयस, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू आणि ऑडीसह अनेक लक्झरी गाड्या उपलब्ध आहेत. पण या ब्रँडच्या सर्वात स्वस्त कारची किंमत किती हे तुम्हाला माहिती आहे का?  

3/12

यानिमित्ताने भारतीय बाजारपेठेत असणाऱ्या आलिशान गाड्यांच्या सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत किती आहे? हे जाणून घ्या.   

4/12

BMW

BMW

जर्मन ब्रँड बीएमडब्ल्यू भारतीय बाजारात 23 मॉडेल्सची विक्री करते. यामधील सर्वात स्वस्त मॉडेल BMW 2 Series आहे, जिची किंमत 43 लाख 90 हजारांपासून सुरु होते.   

5/12

Audi

Audi

ऑडी जवळपास 15 वेगवेगळ्या मॉडेल्सची विक्री करते. यामधील Audi Q3 सर्वात स्वस्त मॉडेल आहे, जिची किंमत 44 लाख 25 हजारांपासून सुरु होते.   

6/12

Mercedes Benz

Mercedes Benz

मर्सिडीज बेंजच्या पोर्टफोलिओत दोन डझनपेक्षा अधिक गाड्या आहेत. या ब्रँडची सर्वात स्वत कार A-Class आहे. या कारची किंमत 46.5 लाखांपासून सुरु होते.   

7/12

Rolls Royce

Rolls Royce

भारतीय बाजापात रोल्स रॉयसच्या 4 कार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामधील सर्वात स्वस्त मॉडेलची Rolls Royce Ghost ची किंमत 6.95 कोटींपासून सुरु होते.   

8/12

Porsche

Porsche

पोर्श आपल्या आलिशान गाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. भारतीय बाजारपेठेत त्यांच्या 7 कार आहेत. यामधील सर्वात स्वस्त मॉडेल Macan ची किंमत 96.5 लाखांपासून सुरु होते.   

9/12

Ferrari

Ferrari

स्पोर्ट्स कारसाठी प्रसिद्ध फेरारी भारतात 5 कारची विक्री करते. यामध्ये 4 कूपे आणि 1 कन्वर्टिबलचा समावेश आहे. यामधील सर्वात स्वस्त मॉडेल Ferrari Roma ची किंमत 3.76 कोटी आहे.   

10/12

Lamborghini

Lamborghini

लॅम्बोर्गिनी आपल्या सेगमेंटमधील बेस्ट सेलिंग ब्रँड आहे. कंपनी मार्केटमध्ये 3 कारची विक्री करतं ज्यामधील सर्वात स्वस्त मॉडेल Huracan EVO ची किंमत 4 कोटींपासून सुरु होते.   

11/12

Maserati

Maserati

इटालियन ब्रँड मासेरातीने नुकताच भारतीय मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी या कारचे 6 मॉडेल उपलब्ध आहेत. यामधील सर्वात स्वस्त मॉडेल Maserati Ghibli ची किंमत 1.15 कोटींपासून सुरु होते.   

12/12

नोट - येथे देण्यात आलेल्या किंमती एक्स-शोरुमनुसार आहेत. देशातील वेगवेगळं ठिकाणी आणि डीलरशिपनुसार त्यात बदल होऊ शकतो.