PHOTO : वयाच्या 10 वर्षी मॉडलिंग, वडिलांच्या निधनाच्या 3 आठवड्यात लग्न, 30 वर्ष पतीची मारहाण केली सहन

Rati Agnihotri Birthday : या अभिनेत्रीने वयाच्या 10 वर्षी मॉडलिंगच्या जगात प्रवेश केला. तर वयाच्या 16 व्या वर्षी ती अभिनयाला सुरुवात केली. 3 वर्षांमध्ये हिने 32 चित्रपटामध्ये काम केलं. तर संजय दत्तसोबत हिचं नाव जोडल्या गेलं होतं. 

नेहा चौधरी | Dec 10, 2024, 15:51 PM IST
1/8

हिंदी आणि तमिळ चित्रपटामध्ये तब्बल 10 वर्षांमध्ये तिने दीडशे चित्रपटांमध्ये काम केलंय. अभिनेत्रीचा जन्म मुंबईतील पंजाबी कुटुंबात झाला. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनेत्री 16 वर्षांची झाल्यावर तिचे वडील कुटुंबासह चेन्नईला शिफ्ट झाले. तिथल्या शाळेत शिकत असताना ती अभिनयही करायची. प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक भारती राजा तिला आपल्या चित्रपटामध्ये घेतलं. पुडिया वरपुकल हा अभिनेत्रीचा पहिला चित्रपट होता. 

2/8

आम्ही बोलत आहोत, रती अग्निहोत्री हिचा बद्दल. 10 डिसेंबरला ती आपल्या 64 वा वाढदिवस साजरा करणार आहे. रतीसाठी तमिळ चित्रपटातील संवाद हिंदीत लिहिले जायचे. नंतर तिने तामिळ शिकली. ती एका मुलाखतीत म्हणाली होती ती चुकून पंजाबी कुटुंबात जन्माला आली पण ती मनाने तमिळ आहे. 

3/8

रजनीकांत, कमल हासन, शोभन बाबू, चिरंजीवी आणि नागेश्वर राव यांसारख्या बड्या तमिळ स्टार्ससोबत त्यांनी काम केले. रतीने 1981 मध्ये कमल हासनसोबत 'एक दुजे के लिए' या बॉलिवूड चित्रपटात काम केले होते. रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी तो ब्लॉकबस्टर घोषित झाला.

4/8

रतीच्या वडिलांचे लग्नापूर्वीच निधन झाले. 9 फेब्रुवारी 1985 रोजी तिने बिझनेसमन अनिल वीरवानी यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीला अलविदा केला. 1987 मध्ये रती आणि अनिल यांना तनुज नावाचा मुलगा झाला.

5/8

रती लग्नानंतर 30 वर्षे लाइमलाइटपासून दूर राहिली. पण एका दिवशी अचानक ती पोलीस ठाण्यात बसलेली दिसली. तिला पोलीस ठाण्यात पाहून सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांना तिने पती अनिल वीरवाणीवर अत्याचार, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. 

6/8

टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत देताना रतीने सांगितलं होतं की, ती गेल्या 30 वर्षांपासून पतीकडून तिचा छळ होत होता. जेव्हा पत्रकाराने तिला विचारलं की ती इतकं दिवस गप्प का राहिली? तेव्हा अभिनेत्री म्हणाली की, माझा मुलगा तनुजसाठी मी इतके दिवस गप्प राहिली. मात्र तिच्या पतीने हे सर्व आरोप फेटाळले होते.

7/8

2015 मध्ये रतीने तिच्या पतीला घटस्फोट दिला आणि आता ती आपल्या मुलगा आणि सूनेसोबत राहते. 16 वर्षे चित्रपटांपासून दूर राहिलेल्या रतीने 2001 मध्ये चित्रपटांमध्ये पुनरागमन केले. 'कुछ खट्टी कुछ मेथी' या चित्रपटात तिने काजोलच्या ग्लॅमरस आईची भूमिका साकारली होती.

8/8

त्या काळात रतीचे नाव संजय दत्तसोबतही अनेकदा जोडलं गेलं. पण या जोडप्याने कधीच कोणासमोर एकमेकांचं नाव घेतलं नाही.