वयाने 12 वर्षं छोट्या अभिनेत्यावर जडलं प्रेम, लग्नासाठी इस्लाम धर्मही स्विकारला; पण आज Ex-Wife म्हणून जगतीये हलाखीचे आयुष्य

बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगने लग्नाआधी इस्लाम धर्म स्विकारला होता. यानंतर तिने सैफ अली खानशी लग्न केलं. 2004 मध्ये अखेर त्यांचा घटस्फोट झाला. सैफने आता करीनाशी लग्न केलं आहे.  

Shivraj Yadav | Sep 14, 2024, 16:07 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगने लग्नाआधी इस्लाम धर्म स्विकारला होता. यानंतर तिने सैफ अली खानशी लग्न केलं. 2004 मध्ये अखेर त्यांचा घटस्फोट झाला. सैफने आता करीनाशी लग्न केलं आहे.

 

1/8

अमृता सिंग बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्रींपैकी आहे. पण फार कमी जणांना अमृता सिंग मुस्लिम आहे याची माहिती आहे.   

2/8

अमृता सिंगने 80, 90 च्या दशकात अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. आता मात्र ती अभिनयापासून दूर आहे.   

3/8

अमृता सिंगने बेताब (1983) चित्रपटातून बॉलिवूडमधून पदार्पण केलं होतं. यानंतर तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं.   

4/8

'मर्द', 'नाम', 'खुदगर्ज', 'वारिस', 'तूफान', 'आइना' आणि 'रंग' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये अमृता सिंगने काम केलं. तिला अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळाले.   

5/8

अमृता सिंगची आई मुस्लीम होती. त्याचं नाव रुखसाना सुल्ताना होतं. अमृता सिंगने लग्नाआधी इस्लाम धर्म स्विकारला.   

6/8

अमृता सिंगने जानेवारी 1991 मध्ये आपल्यापेक्षा 12 वर्षं छोट्या सैफ अली खानशी लग्न केलं. यानंतर 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.  

7/8

अमृता सिंग आणि सैफ अली खान यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुलं आहेत.   

8/8

सैफ अली खानने 2012 मध्ये करिना कपूरशी लग्न केलं असून तिच्यापासून त्याला तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत.