'माझ्याकडे आहे 22 लाखांचा बुटाचा जोड', बादशाहचा खुलासा! 'या' दिवशी वापरायला काढणार; एवढे महाग का?

Badshah On His Rs 22 lakh Sneakers: श्रीमंत व्यक्तींना वेगवेगळ्या गोष्टींच्या कलेक्शनची आवड असते. प्रसिद्ध गायक बादशाहने त्याच्या आशाच एका आवडीबद्दल मुलाखतीत खुलासा केला असून त्याने त्याच्याकडे असलेल्या 22 लाखांच्या बुटांबद्दलची खास बाब काय आहे हे ही सांगितलं आहे. असं या बुटांमध्ये काय खास आहे पाहूयात...

Swapnil Ghangale | Sep 14, 2024, 16:07 PM IST
1/8

badshahboot

प्रसिद्ध रॅप गायक बादशाहने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्याकडे असलेल्या महागड्या बुटांच्या कलेक्शनबद्दल भाष्य केलं.   

2/8

badshahboot

आपल्याकडे 22 लाखांचे बुटांचे जोड आहेत असं बादशाहने सांगितलं. मात्र त्याचबरोबर त्याने हे एवढे महागडे बूट कधी वापरणार आहे हे सुद्धा सांगितलं आहे. हे बूट वापरण्यासाठी बादशाह कोणत्या दिवसाची वाट पाहतोय ते पुढे जाणून घ्या...

3/8

badshahboot

बादशाहने 'लल्लन टॉप'ला दिलेल्या मुलाखतीत तुझ्याकडे 500 बुटांचे जोड आहेत का? असा सवाल विचारण्यात आला.  

4/8

badshahboot

त्यावर बादशाहने, "500 नाही माझ्याकडे एक हजार किंवा त्याहून अधिक जोड आहेत. मी त्यापैकी मोजकेच वापरतो. बाकी कलेक्शन म्हणून आहेत," असं सांगितलं.  

5/8

badshahboot

आपल्या बुटांच्या कलेक्शनमधील सर्वात महागड्या बुटांबद्दल बोलताना बादशाहने, "माझ्याकडे 22 लाख रुपयांचे बुटांचे जोड आहेत. या बुटांचं नाव Nike Yeezy 2 असं आहे," असं सांगितलं. 

6/8

badshahboot

हे बूट एवढे खास का आहेत हे सुद्धा बादशाहने सांगितलं. 'केन वेस्टने (प्रसिद्ध गायक) या बुटांसाठी नायके कंपनीबरोबर करार केला होता. मात्र नंतर तो रद्द केला. हे बूट पॉप कल्चर, स्नीकरहेड्स आणि स्ट्रीटवेअर संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत," असं सांगितलं.

7/8

badshahboot

"या बुटांची किंमत 22 लाख रुपये इतकी आहे. मी ते 6 लाखांना विकत घेतलं होते. मी नक्कीच बुटांवर 22 लाख खर्च करणार नाही. मी बूट गुंतवणूक म्हणून विकत घेत नाही. लोक वेगवेगळ्या कारणांसाठी घड्याळं, बूट आणि बँगा विकत घेतात," असं बादशाह म्हणाला.

8/8

badshahboot

"मी हे महागडे बूट विकत घेतले कारण मी स्नीकरहेड (बूटप्रेमी) आहे. मी ज्या दिवशी ग्रॅमी पुरस्कार जिंकेल त्या दिवशी हे बूट घालणार आहे," असं बादशाह म्हणाला.