BF च्या नवऱ्यावर प्रेम, पतीच्या पहिल्या लग्नात केला डान्स, वय वाढवण्यासाठी आईने दिलं हार्मोनल इंजेक्शन?

Entertainment : या अभिनेत्रीने बालपणापासून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्येत नाही तर इंडस्ट्रीतही तिने आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केलीय. आज तिचा 32 वाढदिवस असून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती कायम चर्चेत राहिली.   

नेहा चौधरी | Aug 09, 2024, 11:26 AM IST
1/10

ग्लॅमरने भरलेल्या जगात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कलाकारांना अनेकदा अनेक वादांनाही सामोरे जावं लागतं. या अभिनेत्रीला अनेक वादाचा सामाना करावा लागला. तिची लव्ह लाइफपासून लहान वयात मोठी दिसावी म्हणून हार्मोनल इंजेक्शनपर्यंत अनेक वाद झालेत. 

2/10

आम्ही बोलत आहोत, हृतिक रोशनसोबत बालकलाकार म्हणून काम करणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी. तिने बॉलिवूडसह अनेक भाषांमध्ये काम केलंय. 

3/10

वयच्या 15 वर्षी तेलगू चित्रपट 'देसामुदुरु' मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून ती झळकली. अभिनेत्रीच्या या चित्रपटाने चांगली कमाई केली. मात्र या काळात ती अनेक वादातही अडकली.

4/10

हंसिकाला लहान वयात तरुण दिसण्यासाठी तिच्या आईने हार्मोनल इंजेक्शन दिल्याच अफवा पसरल्या होता. पण तिच्या लग्नाचा सोहळा दाखवणाऱ्या शोमध्ये तिने याबद्दल खुलासा केला होता. आपण कुठलही हार्मोनल इंजेक्शन घेतलं नसल्याच ती म्हणाली होती. 

5/10

हंसिकाने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'त्यावेळी ती आणि तिची आई अनेक वेदनेतून गेले होते. असे आरोप त्यांना सहन होत नव्हते. पण या क्षेत्रात काम करताना अशा वादांना सामोरे जावं लागते असंही ती म्हणाली.'

6/10

दुसऱ्यांदा हंसिका वादात अडकली जेव्हा तिचा लग्नाची चर्चा सुरु झाली. तिने आपल्या बेस्टफ्रेंडचा संसार मोडला. अभिनेत्रीने मैत्रिणीचा नवरा सोहेल कथुरियासोबत केलं तेव्हा तिला घर तोडणारी महिला म्हणून टॅग मिळाला होता.   

7/10

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हंसिका मोटवानी तिचा नवऱ्याचा पहिला लग्नात सहभागी झाली होती. मात्र, घटस्फोटानंतर सोहेलची हंसिकासोबतची प्रेमकहाणी सुरू झाली. त्यावर ती म्हणाले होते की, 'ती पब्लिक फिगर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दलच चर्चा अधिक मीडियातून सुरु झाली.'

8/10

तर 2015 मध्ये हंसिका मोटवानीचा एक एमएमएस लीक झाला होता. ज्यामध्ये ती आंघोळ करताना दिसली होती. पण हंसिकाने हा व्हिडीओ फेक सांगितला होता आणि या व्हिडीओमधील तरुणी ती नसल्याच तिने स्पष्ट सांगितल होतं.   

9/10

 हंसिका मोटवानी तिच्या कामासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. जिथे ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

10/10

32 वर्षीय हंसिकाचा संपत्तीबद्दल बोलायच झालं तर मीडिया रिपोर्टनुसार तिची एकूण संपत्ती ही 37 कोटी असून ती दर महिन्याला 40 लाखांहून अधिक कमावते. बॉलिवूडसह साऊथ सिनेसृष्टीतही काम करते.