असे तेव्हाच होईल, जेव्हा आमची इच्छा असेल- बिपाशा बसू

Jan 19, 2018, 17:56 PM IST
1/5

ॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना काही दिवसांपासून उधाण आले होते. अभिनेता करण सिंग ग्रोवरशी विवाहबद्ध झाल्यावर ती प्रेग्नेंट असल्याच्या अफवा फिरत होत्या. त्यावर आता खुद्द बिपाशाने ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. 

2/5

Bipasha Basu

Bipasha Basu

बिपाशाने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मी एक बॅग घेऊन कारमध्ये बसले होते आणि तेव्हा पुन्हा मीडियाने मला मी प्रेग्नेंट असण्याबद्दल विचारण्यास सुरूवात केली. मी प्रेग्नेंट नाहीये. या चर्चांनी मी त्रासले आहे. शांत रहा. असे तेव्हाच होईल जेव्हा आमची इच्छा असेल.

3/5

बिपाशा आणि करण २०१५ मध्ये आलेल्या अलोन चित्रपटात एकत्र झळकले होते आणि २०१६ मध्ये दोघे विवाहबद्ध झाले. 

4/5

मॉडलिंगपासून बिपाशाने आपल्या करिअरची सुरूवात केली. १९९६ मध्ये कोलकत्ता येथील एका हॉटेलमध्ये मॉडल जीसीया रामपाल यांनी बिपाशाला पाहिले आणि त्यांनी तिला मॉडलिंग करण्याचा सल्ला दिला.

5/5

अलीकडेच मुंबईत बिपाशा बसुची मस्त बर्थडे पार्टी झाली. या पार्टीत बिपाशा आणि करणचे जवळचे मित्र सहभागी झाले होते.