'मला कळत नाही की विकेट्सची गरज असताना रोहितने...'; WC Final नंतर माजी कर्णधाराला पडला प्रश्न
Australia Beat India In world cup 2023 Final: अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते बॉलिवूड स्टार्सपर्यंत अनेक अति महत्त्वाच्या व्यक्तींनी हजेरी लावलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा 6 विकेट्सने पराभव झाला. ऑस्ट्रेलियन संघाने यजमान संघाला पराभूत करत सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. या सामन्यानंतर आता भारतीय कर्णधार रोहित शर्माचे काही निर्णय अगदीच अनाकलनिय असल्याचं एका माजी कर्णधाराने म्हटलंय. कोणं आणि नेमकं काय म्हणालंय पाहूयात...
Swapnil Ghangale
| Nov 21, 2023, 16:26 PM IST
1/12
2/12
3/12
ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं. भारताच्या अनपेक्षित पराभवामुळे कर्णधार रोहित शर्मापासून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजलाही अश्रू अनावर झाले. भारताच्या या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि फलंदाज सलमान बटने ऑस्ट्रेलियन संघाचं कौतुक करताना रोहितच्या एका निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.
4/12
5/12
6/12
टॉस हरल्याने भारताला पहिल्यांदाच धक्का बसल्याचंही सलमान बट म्हणाला. "भारताने उत्तम सुरुवात केली. रोहित शर्माने चांगली सुरुवात भारताला करुन दिली. मला वाटतं की त्याच्याकडून सर्वात मोठी चूक ही झाली की वर्ल्ड कप फायनलसारख्या मोठ्या सामन्यामध्ये तुम्ही एखादं ठराविक ध्येय निश्चित केलं पाहिजे. हा टप्पा ओलांडल्यानंतर तुम्ही वेगाने धावा करायला हव्यात," असं सलमान बट म्हणाला.
7/12
8/12
9/12
10/12
"सूर्यकुमार यादवने जबाबदारी खांद्यावर घ्यायला हवी होती. ते त्यानं केलं नाही. तो नेमकं काय करत होता हेच मला समजलं नाही. तळाच्या फलंदाजांबरोबर खेळताना आपण स्ट्राइक घेऊन जास्ती जास्त बॉल खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सूर्यकुमार मोठे फटके मारण्याऐवजी एक धाव काढून नॉन स्ट्राइकर एण्डला जात होता," असं निरिक्षण सलमानने नोंदवलं.
11/12
12/12