अमृत भारत योजनेअंतर्गत मुंबईतील 'या' 3 रेल्वे स्थानकांचा कायापालट, 2.2 लाख प्रवाशांना फायदा

Amrit Bharat Yojana: मध्य रेल्वे 76 स्थानकांचे नूतनीकरण करणार असून त्यापैकी 15 स्थानके मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात असतील. रेल्वे स्थानकांवरील सेवा आणि सुविधांचा दर्जा अधिक चांगल्या प्रकारे आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पाची किंमत 24,470 कोटी रुपये असून यामध्ये देशभरातील रेल्वे स्थानकांचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येणार आहे.

| Aug 07, 2023, 10:28 AM IST

1/9

अमृत भारत योजनेअंतर्गत मुंबईतील 'या' 3 रेल्वे स्थानकांचा कायापालट, 2.2 लाख प्रवाशांना फायदा

Amrit Bharat Yojana Mumbai 3 railway stations transformed world Class

Amrit Bharat Yojana: अमृत भारत योजनेअंतर्गत देशातील रेल्वे स्थानके जागतिक दर्जाची केली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील 1,309 रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचे आश्वासन देत अमृत भारत स्टेशन योजना सुरू केली. 

2/9

स्थानकांचे नूतनीकरण

Amrit Bharat Yojana Mumbai 3 railway stations transformed world Class

मध्य रेल्वे 76 स्थानकांचे नूतनीकरण करणार असून त्यापैकी 15 स्थानके मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात असतील. रेल्वे स्थानकांवरील सेवा आणि सुविधांचा दर्जा अधिक चांगल्या प्रकारे आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 

3/9

टप्प्याटप्प्याने विकास

Amrit Bharat Yojana Mumbai 3 railway stations transformed world Class

या प्रकल्पाची किंमत 24,470 कोटी रुपये असून यामध्ये देशभरातील रेल्वे स्थानकांचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येणार आहे.

4/9

नियोजनबद्ध परिवर्तन

Amrit Bharat Yojana Mumbai 3 railway stations transformed world Class

पहिल्या टप्प्यात 508 स्थानकांवर नियोजनबद्ध परिवर्तन केले जाईल, ज्यामध्ये मास्टर प्लॅन तयार करुन अंमलबजावणी केली जाईल. स्टेशनची सुलभता वाढवणे, प्रतीक्षा क्षेत्र अपग्रेड करणे, स्वच्छताविषयक सुविधा सुधारणे, लिफ्ट/एस्केलेटर बसवणे, वाय-फाय कनेक्टिव्हिटी सारख्या सुविधा दिल्या जातील.

5/9

प्रवासी समावेशकता

Amrit Bharat Yojana Mumbai 3 railway stations transformed world Class

या योजनेत स्थानकांचे त्यांच्या सभोवतालचे एकत्रीकरण, अखंड मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट इंटिग्रेशन, अपंग व्यक्तींसाठी तरतूद, शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाय आणि प्रवासी समावेशकता यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. 

6/9

मुंबईत 3 स्थानके

Amrit Bharat Yojana Mumbai 3 railway stations transformed world Class

मध्य रेल्वेच्या 38 स्थानकांपैकी तीन स्थानके मुंबईतील आहेत. परळ रेल्वे स्थानक 19.41 कोटी रुपये, विक्रोळी रेल्वे स्थानक 19.16 कोटी रुपये आणि कांजूरमार्ग रेल्वे स्थानकासाठी 27.01 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

7/9

76 मध्य रेल्वे स्थानके

Amrit Bharat Yojana Mumbai 3 railway stations transformed world Class

याअंतर्गत 76 मध्य रेल्वे स्थानकांचाही मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास केला जाईल. मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर विभागांमध्ये पसरलेल्या या स्थानकांचा सर्वसमावेशक बदल करण्यात येणार आहे. 

8/9

उत्तम कनेक्टिव्हिटी

Amrit Bharat Yojana Mumbai 3 railway stations transformed world Class

बदलांमध्ये सौंदर्यदृष्टया आनंददायी स्थानक इमारत, स्वच्छ वातावरणासाठी स्वच्छ भारत-प्रेरित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, विहंगम लँडस्केपसह आकर्षक प्लॅटफॉर्म, अपग्रेड केलेल्या प्रवासी सुविधा, अतिरिक्त लिफ्ट आणि एस्केलेटरसह उत्तम कनेक्टिव्हिटी दिली जाईल. 

9/9

आधुनिक माहिती प्रणाली

Amrit Bharat Yojana Mumbai 3 railway stations transformed world Class

यासोबतच आधुनिक मार्गदर्शन आणि माहिती प्रणाली, ठिकाणांचे प्रशासकीय नूतनीकरण यांचा समावेश आहे.