अल्लू अर्जुन ते प्रभास, 'हे' साऊथ सुपरस्टार्स कोट्यवधीश नाही तर अरबपती, संपत्ती एवढी की बॉलिवूड दिग्गज यांच्यासमोर पानी कम

South Superstars Networth : बॉलिवूड चित्रपटांच्या व्यतिरिक्त मागील काही वर्षात दाक्षिणात्य सिनेमे देखील बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवत आहेत. वेगळ्या संकल्पना,ओरिजनल गोष्ट, बिगबजेट सिनेमे इत्यादींमुळे दाक्षिणात्य सिनेमे प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत. सिनेमे हिट ठरल्यावर त्यातील कलाकारांची प्रसिद्धी देखील वाढते. तेव्हा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अशाच प्रसिद्ध कलाकारांच्या एकूण संपत्ती विषयी जाणून घेऊयात. 

| Dec 10, 2024, 13:57 PM IST
1/7

दाक्षिणात्य चित्रपट हे फक्त भारतातच नाहीत तर जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे त्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या प्रसिद्धीत तसेच संपत्तीत देखील मोठी वाढ होतेय.   

2/7

अल्लू अर्जुन :

पुष्पा आणि पुष्पा 2 या चित्रपटांमधून नॅशनल स्टार बनलेला साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती 350 कोटी इतकी आहे. मीडिया रिपोर्टनुसार 'पुष्पा - द राइज' नंतर अभिनेता अल्लू अर्जुन चित्रपटासाठी घेत असलेल्या फी मध्ये मोठी वाढ झाली. 

3/7

थलापति विजय :

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सर्वात श्रीमंत सुपरस्टार्सच्या यादीमध्ये थलापति विजयचं सुद्धा नाव येतं. लियो, गोट आणि मास्टर सारख्या चित्रपटांचा भाग राहिलेल्या विजयची एकूण संपत्ती ही 474 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी तो कोट्यवधी रुपये घेतो. 

4/7

प्रभास :

बाहुबली आणि सालार सारखे सुपरहिट चित्रपट देणारा दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याची एकूण संपत्ती देखील डोळे दिपवणारी आहे. प्रभास तब्बल 241 कोटींच्या संपत्तीचा मालक असून मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रभास ने कल्कि 2898 एडी चित्रपटासाठी 100  कोटी रुपये फी घेतली होती. 

5/7

रजनीकांत :

रजनीकांत हे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांनातर त्यांचे फॅन्स 'थलाइवर' असं देखील म्हणतात. रजनीकांत यांची एकूण संपत्ती ही जवळपास 450  कोटी इतकी आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्यांनी वेट्टाईयन या चित्रपटासाठी तब्बल 125 कोटी रुपये फी घेतली आहे. 

6/7

अजीत कुमार :

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या लिस्टमध्ये अजीत कुमार याचं देखील नाव येत. अनेक हिट चित्रपट देणारे अजीत कुमार यांची एकूण संपत्ती 96 कोटींच्या जवळपास आहे. त्याच्या थुनिवोने बॉक्स ऑफिसवर 130 कोटींचा गल्ला जमवला होता. 

7/7

कमल हासन :

कमल हासन हे देखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बडे कलाकार आहेत. कमल हासन यांची एकूण संपत्ती ही जवळपास 150 कोटी इतकी आहे.