Googleने इतिहास घडवलाः एवढीशी चिप सुपर कॉम्प्युटरपेक्षा हजार कोटी पट फास्ट! एलन मस्क Shocked

Google Quantum Willow Chip:  सुपर कॉम्प्युटरलाही उत्तर द्यायला करोडो वर्षे लागतील, पण गुगलची 'ही' नवी चिप 5 मिनिटांत उत्तर देईल असा दावा करण्यात आला आहे. 

| Dec 10, 2024, 13:38 PM IST

Google Quantum Willow Chip:  सुपर कॉम्प्युटरलाही उत्तर द्यायला करोडो वर्षे लागतील, पण गुगलची 'ही' नवी चिप 5 मिनिटांत उत्तर देईल असा दावा करण्यात आला आहे. 

1/8

पाच मिनिटांत सोडवणार अवघड समस्या

गुगलच्या शास्त्रज्ञांनी नवीन क्वांटम चिप विलो विकसित केली आहे. गुगलने दावा केला आहे की नवीन चिपने फक्त पाच मिनिटांत एक समस्या सोडवली आहे. जी सोडवण्यासाठी जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटरला करोडो वर्षे (म्हणजे विश्वाच्या वयापेक्षा जास्त!) लागली असतील.   

2/8

सुपर कॉम्प्युटरला मागे टाकले

यामुळे क्वांटम कॉम्प्युटर अपग्रेड होईल आणि त्यात त्रुटी राहण्याची शक्यता कमी होईल, असे सांगितले जात आहे. क्वांटम कम्प्युटिंगमधील ही प्रगती तेव्हा समोर आली जेव्हा विलोने बेंचमार्क अल्गोरिदममध्ये फ्रंटियर सुपर कॉम्प्युटरला मागे टाकले.  

3/8

काही मिनिटांत कार्य

गुगलच्या मते, विलो चिप हे कार्य काही मिनिटांत करू शकते. ,ज्याला  फ्रंटियरला अर्थात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटरला पूर्ण करण्यासाठी 10,000,000,000,000,000,000,000,000 वर्षे लागतील, जे विश्वाच्या वयापेक्षा जास्त आहे.

4/8

परफॉर्मेंस

हा परफॉर्मेंस 2019 मध्ये Google ने केलेल्या पूर्वीच्या दाव्यांच्या तुलनेत एक मोठी सुधारणा आहे.  कंपनीने सांगितले की ही चिप काही मिनिटांत शास्त्रीय संगणकांसाठी 10,000 वर्षे लागतील अशी समस्या सोडवू शकते.  

5/8

सुंदर पिचाई यांनी केली पोस्ट

गुगलचे सीइओ सुंदर पिचाई (CEO of Google) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबद्दल एक पोस्ट केली होती, ज्याने एलोन मस्कला खूप प्रभावित केले आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या पोस्टवर त्यांनी 'वाह' अशी प्रतिक्रिया दिली आहे.  

6/8

कधीपासून वापरायला मिळणार ही चिप?

गुगलच्या नवीन विलो चिपचा प्रत्यक्ष वापर होण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच, त्याच्या वापरासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करावे लागतील.  

7/8

विलो चिप कुठे वापरली जाईल?

गगूलची नवीन क्वांटम चिप विलो औषध शोधण्यासाठी, न्यूक्लियर फ्यूजन रिॲक्टर एनर्जी आणि कार बॅटरी डिझाइन यासारख्या क्षेत्रात वापरली जाऊ शकते.

8/8

कोणत्या तत्त्वांवर कार्य करते?

क्वांटम चिप  मेकॅनिक्सच्या तत्त्वांवर कार्य करते, जे पारंपारिक संगणकांपेक्षा बरेच वेगळे आहे. यामध्ये, कॅल्क्युलेशन करण्यासाठी सब-एटॉमिक पार्टिकलच्या विहेवियरचा वापर केला जातो. ज्यामुळे गणनाचा वेग सुपर कॉम्प्युटरपेक्षा वेगवान असतो.