Rent वर मिळतंय प्राजक्ता माळीचं कर्जतमधील Farm House; एका दिवसाचं भाडं फक्त...; पाहा Photos

You Can Rent Prajaktta Mali Farm House Know The Rent: अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कमाईच्या स्रोतांपैकी एक महत्त्वाचा स्रोत म्हणून या फार्महाऊसकडे पाहिलं जातं. हे फार्महाऊस आहे कसं आणि त्याचं भाडं किती आहे पाहूयात...

| Dec 30, 2024, 15:07 PM IST
1/13

prajakttamalifarmhouse

अभिनेत्री प्राजक्ता माळीचं फार्महाऊस भाडेतत्वावर घेता येतं. हे फार्महाऊस आहे कसं आणि त्याचं भाडं किती आहे जाणून घेऊयात...

2/13

prajakttamalifarmhouse

बीडमधील भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी एका राजकीय प्रकरणावरुन प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीबरोबरच दाक्षिणात्य अभिनेत्री स्मृती मंधानाचा नावं घेतल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

3/13

prajakttamalifarmhouse

अभिनेत्री प्राजक्ता माळीने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांनी आपली माफी मागावी अशी मागणी केली. तसेच या प्रकरणी आपण महिला आयोगाकडे तक्रार केल्याचंही म्हटलं आहे. प्राजक्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यासंदर्भात भेटल्याचे समजते.

4/13

prajakttamalifarmhouse

या प्रकरणामुळे प्राजक्ता चर्चेत असतानाच आता तिची संपत्ती आणि खास करुन कर्जतमधील फार्महाऊसही चर्चेत आहे.  

5/13

prajakttamalifarmhouse

प्राजक्ता माळीचं हे फार्म हाऊस सर्वसामान्यांनाही भाडे तत्वावर उपलब्ध आहे. हे फार्महाऊस आहे तरी कसं आणि त्याचं भाडं किती आहे पाहूयात...  

6/13

prajakttamalifarmhouse

कर्जतला प्राजक्ताचं एक मोठं फार्महाऊस आहे. प्राजक्तकुंज असं या फार्महाऊसचं नाव आहे.  

7/13

prajakttamalifarmhouse

प्राजक्तकुंज हे 3 बीएचकेचं प्रशस्त असं फार्महाऊस असून ते 15 ते 20 लोकांच्या पिकनिकसाठी उत्तम पर्याय आहे.   

8/13

prajakttamalifarmhouse

प्राजक्ता माळीच्या या फार्महाऊसची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचं सांगितलं जातं.  

9/13

prajakttamalifarmhouse

प्राजक्ताच्या कुटुंबाकडे असलेल्या सर्वात महत्त्वाच्या स्थावर मालमत्तेमध्ये या फार्महाऊसचा समावेश होतो.  

10/13

prajakttamalifarmhouse

शनिवारी, रविवारी प्राजक्ता माळीचं हे फार्महाऊस भाड्याने घ्यायचं असेल तर एका दिवसाच्या स्टेसाठी 30000 रुपये भाडं आकारलं जातं.   

11/13

prajakttamalifarmhouse

सोमवार ते शुक्रवारदम्यान प्राजक्ताच्या या फार्महाऊसमध्ये राहण्यासाठी एका दिवसाचे 17 ते 20 हजार रुपये मोजावे लागतात.  

12/13

prajakttamalifarmhouse

प्राजक्ताच्या या फार्महाऊसचे सुंदर फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहेत.  

13/13

prajakttamalifarmhouse

'एअरबीएनबी'सारख्या माध्यमातून हे फार्महाऊस भाडेतत्वावर उपलब्ध आहे.