अजिंक्य देवकडून शिका एक मुलगा आणि बाबा ही दोन्ही नाती जपण्याची सुरेख कला
Ajinkya Deo Birthday : महाराष्ट्रातील देखणा अभिनेता अजिंक्य देव यांचा 61 वा वाढदिवस. खासगी जीवनात अजिंक्य देवचं वेगळेपण...
अजिंक्य देव यांचा आज 61 वा वाढदिवस. अजिंक्य देव हे रमेश देव आणि सीमा देव यांचे सुपुत्र. तर आर्य आणि तनयाचे बाबा आहेत. मुलगा आणि बाबा या दोन्ही नाती अतिशय सुंदरपणे जपणाऱ्या अजिंक्य देवची खास बाजू पाहूया. एक पुरुष या सगळ्या गोष्टी कशा सांभाळाव्यात हे शिकण्यासारखं.
1/7
महाराष्ट्राचा देखणा अभिनेता
महाराष्ट्राला लाभलेला रांगडा 'सर्जा' म्हणजे अजिंक्य देव. 'माहेरची साडी', 'माझं घर माझा संसार', 'बाळा जो जो रे', 'सौ शशी देवधर', 'घायाळ, 'संसार' यासारख्या सिनेमांमधून एक देखणा अभिनेता प्रेक्षकांसमोर आला. या कलाकाराने फक्त मराठीतच नाही तर हिंदी आणि हॉलिवूडमध्येही आपली कला सादर केली. आज अजिंक्य देव यांचा 61 वा वाढदिव.
2/7
हळवा कोपरा
'आई-बाबांच्या जाण्यानंतर आयुष्य रिकाम झालंय. खाली वाकून कोणाला नमस्कार करायचा? तर आज आशीर्वाद देणारे हात डोक्यावर नाहीत. आई-बाबा गेल्यानंतर मी जाणीवपूर्वक स्वतःला सतत कामात व्यग्र ठेवलं. आई-बाबा नसणं ही न भरून येणारी पोकळी आहे. ते आमच्यासोबत नाहीत; हे स्वीकारणं फार अवघड आहे.' एका मुलाखतीत अजिंक्य देव यांनी व्यक्त केलेली भावना
3/7
लेकीचा लाडका बाबा
अजिंक्य देव यांच्या पत्नीचं नाव आरती आहे. तर या दोघांना दोन मुले आहेत. या दोघांची नावे आर्य आणि तनया अशी आहेत. तनया ही स्पेशल चाईल्ड आहे. अनेक वर्षांपूर्वी तनयाच्या उपचारासाठी अजिंक्य देव आणि आरती यांनी अमेरिकेतील एका इन्स्टिट्यूटमध्ये उपचार घेतली. लेकीसाठी कायमच अजिंक्य देव प्रयत्नशील असतात. एवढंच नव्हे तर अजिंक्य देव अनेकदा सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना दिसतात.
4/7
पालकांसोबतचा संवाद महत्वाचा
अजिंक्य देव अनेकदा पालक आणि सिनेकलाकार अजिंक्य देव आणि सीमा देव यांच्यासोबत कायमच फोटो पोस्ट करायचे. त्यांच्यातील नातं अनेकदा त्यांनी व्यक्त केलं आहे. पालकांना कायम मुलांसोबतचा संवाद महत्त्वाचा वाटतो. पालक ज्यावेळी ज्येष्ठ मंडळी होतात तेव्हा मुलांनी पालकांना वेळ द्यावा. कारण तोच त्यांच्यासाठी मोलाचा असतो. प्रत्येक मुलांनी ही गोष्ट करायला हवी.
5/7
मुलांना हवं असतं अटेंशन
मुलांना कायमच अटेंशन हवं असतं. अजिंक्य देव आपल्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसतात. तनयासाठी घेतली जाणारी स्पेशल मेहनतही त्यांच्या कृतीतून दिसते. तनया स्पेशल चाईल्ड आहे तिच्यासाठी अजिंक्य देव आणि त्यांची पत्नी कायमच खंबीरपणे उभे असतात. प्रत्येक मुलाला पालकांचा वेळ हवा असतो. कारण या क्षणांमध्ये त्यांचं नातं अधिक घट्ट होतं.
6/7
हॉलिवूडमध्येही झळकले अजिंक्य
अजिंक्य देव यांनी 1996 मध्ये ‘द पीकॉक स्प्रिंग’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2019 मध्ये आलेल्या ‘द वॉरीयर क्वीन ऑफ झांसी’ या हॉलिवूड चित्रपटात अजिंक्य देव यांनी तात्या टोपेंची भूमिका साकारली होती. अजिंक्य देव यांनी मराठी, बॉलिवूड आणि हॉलिवूड या तिन्ही सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे.
7/7