गुगल, कॉफी आणि अमिताभ! भारतातल्या या गावातील मुलांची अजब नावं... पाहा कुठे आहे हे गाव

Ajab Gajab : भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. काही किलोमीटरच्या अंतरावर आपल्या देशात वेगळ्या भाषा आणि वेगळी संस्कृती पाहिला मिळते. भारतात अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहातात. भारतात काही जातीजमाती अशा आहे ज्यांच्या अजब प्रथा परंपरा आहेत. कर्नाटकात (KARNATAKA) अशीच एक आदिवासी जात आहे. या जातीतील लोकं आपल्या मुलांची नावं हटके ठेवतात. या मुलांच्या नावाची सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा असते. 

Mar 22, 2023, 14:05 PM IST
1/5

सध्या इंटरनेटचं यूग आहे. आपल्याला कोणत्याही गोष्टीबद्दल माहिती हवी असेल तर आपण गुगल सर्च इंजिनचा वापर  करतो. गुगल हे सर्वाधिक वापरलं जाणार सर्च इंजिन आहे. पण तुम्हाला ऐकूण आश्चर्य वाटेल की गुगल हे केवळ सर्च इंजिनचं नाही तर मुलांचीदेखील नावं आहेत. 

2/5

भारतात असं एक गाव आहे, जीथे लोकं आपल्या मुलांची नावं हटके ठेवतात. ही नावं ऐकण्यासाठी विचित्र आणि अजब वाटत असली तरी त्या मुलांना आपल्या नावाबद्दल कोणतीय समस्या नसते. पालकांनाही आपल्या मुलांची नावं आवडतात. 

3/5

कर्नाटकातल्या आदिवासी भागात हिक्की-पिक्की नावाची एक जात आहे. हिक्की-पिक्की जाताची प्रमुक व्यवसाय हा शिकार करणं आहे. 1960 च्या दरम्यान या जातीतल्या लोकांना जंगलातून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्यांनी मैसूर आणि बंगळुरुमधल्या ग्रामीण भागात आपलं बस्तान बसवलं.

4/5

या जातीतल्या मुलांची नावं चांगलीच चर्चेत असतात. जातीतल्या लोकांनी आपल्या मुलांची हटके असावीत असा विचार केला आणि त्यातून त्यांनी मुलांची नावं गुगल, कॉफी, एलिझाबेथ, मैसूर, अमिताभ, शाहरुख अशी ठेवायला सुरुवात केली. 

5/5

या जातीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या जातीतल्या लोकांना अनेक भाषा बोलतात येतात. म्हणजे कन्नड, मल्यालम, तामिळ, तेलुगू या भाषांशिवाय इतरही काही भाषांचं ज्ञान त्यांना अवगत आहे. या जातितल्या लोकांकडे नागरिकत्वाची कोणताही कागदपत्र नाहीत.