रणवीर सिंगनं मोडला Virat Kohli चा 'हा' रेकॉर्ड!

Top 5 Brand Celebrity Value : कोणताही सेलिब्रिटी असो किंवा कलाकार तरी त्यांना ब्रॅंड व्हॅल्यू ही खूप महत्त्वाची असते. सगळ्यात जास्त ब्रॅंड व्हॅल्यु असणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये आता बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचेही नाव आले आहे. भारतात सगळ्यात जास्त कोणत्या सेलिब्रिटीची ब्रँड व्हॅल्यू असेल तर ती आता पर्यंत भारतीय क्रिकेटर विराट कोहलीची. विराटचे लाखो चाहते आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून त्याच्या वाईट खेळीचा आता त्याच्या ब्रँड व्ह्ल्यूवर परिणाम झाला आहे. 

Mar 22, 2023, 14:01 PM IST
1/8

ranveer singh beats virat kohli

विराटची जागा आता रणवीर सिंगनं घेतली आहे. तर विराट दुसऱ्या स्थानावर आला आहे. 

2/8

ranveer singh beats virat kohli

2020 मध्ये विराटची ब्रँड व्हल्यू ही 237.7 मिलियन डॉलर इतकी होती. 2021 मध्ये विराटची ब्रँड व्हल्यू ही 185.7 मिलियन डॉलर होती. त्यानंतर 2022 मध्ये विराटची ब्रँड व्हल्यू ही कमी होऊन 176. 9 मिलियन डॉलर इतकी झाली होती. 

3/8

ranveer singh beats virat kohli

रणवीर सिंगबद्दल बोलायचे झाले तर तो आता सगळ्यात महागड्या सेलिब्रिटींपैकी एक झाला आहे. रणवीरची ब्रँड व्हल्यू ही 181.7 मिलियन डॉलर इतकी झाली आहे.   

4/8

ranveer singh beats virat kohli

विराट कोहलीची ब्रँड व्हल्यू ही रणवीर पेक्षा थोडीच कमी झाली आहे. तर रणवीरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याचा 'सर्कस' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्यानं बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई केलेली नाही. 

5/8

ranveer singh beats virat kohli

दरम्यान, विराट कोहली हा गेल्या 5 वर्षांपासून ब्रँड व्हल्यूमध्ये पहिल्याच स्थानावर होता. 

6/8

ranveer singh beats virat kohli

विराटनंतर आता तिसऱ्या क्रमांकावर अक्षय कुमार आहे. 

7/8

ranveer singh beats virat kohli

अक्षय कुमारनंतर आलिया भट्ट चौथ्या क्रमांकावर आहे. 

8/8

ranveer singh beats virat kohli

तर दीपिका पदुकोण ही पाचव्या क्रमांकावर आहे.