Aishwarya Rai Bachchan: परदेशातून सर्जरी करुन परतली ऐश्वर्या राय बच्चन? चेहऱ्याची चरबी गायब झाल्याने चाहते थक्कं, 'ही जादू रातोरात घडली...'

Aishwarya Rai Bachchan Face Surgery : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या खूप व्हायरल असताना ऐश्वर्याने चेहऱ्याची सर्जरी केल्याची बातमी समोर येतंय. 

नेहा चौधरी | Aug 02, 2024, 12:33 PM IST
1/7

गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेषक बच्चन यांच्यामध्ये काही आलबेल नाही. त्याशिवाय या दोघांचं घटस्फोट होणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्यात परदेशातून परतल्यानंतर ऐश्वर्याने चेहऱ्याची शस्त्रक्रिया केली अशी बातमी जोर धरतंय. 

2/7

ऐश्वर्या राय बच्चनने चेहऱ्याची सर्जरी केली यामध्ये किती तथ्य आहे याबद्दल अधिकृत कुठलीही पुष्टी नाही. पण भारतातून जाण्यापूर्वी ऐश्वर्या राय बच्चन अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात दिसली होती. 

3/7

त्यावेळी तिच्या चेहरा हा खूप हेल्दी दिसत होता. पण ती परदेशातून परतल्यानंतर चेहऱ्याची चरबी गायब झाल्याच नेटकऱ्यांचं म्हण आहे. 

4/7

परदेशातून परतल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चनचा चेहरा खूप बदलला असून तिने शस्त्रक्रिया केली असे तर्क चाहते आणि नेटकरी लावत आहेत. 

5/7

ऐश्वर्याचे हे लेटेस्ट फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना विश्वास बसतो की, अचानक तिच्या चेहऱ्यावरील चरबी कशी नाहीशी झाली. यामागील गुपित काय असा प्रश्न चाहते विचारत आहेत.  

6/7

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नातील लूकमुळे ऐश्वर्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. ड्रेसिंगपासून ते वजन वाढण्यापर्यंत विविध गोष्टी सोशल मीडियावर चर्चेत होत्या. 

7/7

ऐश्वर्याचे नवीन फोटो पाहून चाहत्यांचा असा विश्वास आहे की तिने परदेशात चेहऱ्यावर फॅटची शस्त्रक्रिया केलीय. मात्र यामागे स्टाइलिंग आणि मेकअपचा चमत्कार देखील असू शकतो.