मुंबई-अहमदाबाद तर ट्रेलर! देशात 7 मार्गांवर धावणार बुलेट ट्रेन, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत येणार Bullet Train

भारतात बुलेट ट्रेन कधी धावणार याची सगळ्यांनाच प्रतिक्षा आहे. जपानच्या मदतीने मुंबई- अहमदाबाद दरम्यान पहिली बुलेट ट्रेनचे काम अंतिम टप्प्यात आहे. पण हा तर फक्त ट्रेलर आहे लवकरच भारतातील 7 रूटवर बुलेट ट्रेन सुरू करण्याचा प्लान आहे. 

Mansi kshirsagar | Dec 14, 2024, 13:19 PM IST

भारतात बुलेट ट्रेन कधी धावणार याची सगळ्यांनाच प्रतिक्षा आहे. जपानच्या मदतीने मुंबई- अहमदाबाद दरम्यान पहिली बुलेट ट्रेनचे काम अंतिम टप्प्यात आहे. पण हा तर फक्त ट्रेलर आहे लवकरच भारतातील 7 रूटवर बुलेट ट्रेन सुरू करण्याचा प्लान आहे. 

1/7

मुंबई-अहमदाबाद तर ट्रेलर! देशात 7 मार्गांवर धावणार बुलेट ट्रेन, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत येणार Bullet Train

 after Mumbai Ahmedabad bullet train More bullet trains coming to India maharashtra soon

भारतीय रेल्वेनुसार, मुंबई ते अहमदाबादपर्यंत पहिली बुलेट ट्रेन 2026 पर्यंत सुरू होऊ शकते. या ट्रेनचा वेग 320 किमी प्रतितास इतका आहे. या ट्रेन व्यतिरिक्त दिल्ली ते वाराणसीपर्यंत बुलेट ट्रेन नेण्याच्या तयारीत आहेत. बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर 852 किमीचे अंतर जवळपास अडीच तासांत पूर्ण होणार आहे. आता दिल्ली ते वाराणसी पोहोचण्यासाठी 12 तासांचा वेळ लागतो. 

2/7

देशात बुलेट ट्रेनचा तिसरा रूट दिल्ली ते अहमदाबाद दरम्यान तयार होऊ शकतो. या दोन शहरातील अंतर जवळपास 971 किमी इतकं असून हे पूर्ण करण्यासाठी 16 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर हे अंतर 3 तासांत पूर्ण होऊ शकते. 

3/7

सरकारने दिल्ली ते अमृतसर या मार्गांवरही बुलेट ट्रेन चालवण्याची योजना आखण्यात येत आहे. या दोन शहरांमधीव अतंर 466 किमी इतकं असून हे पूर्ण करण्यासाठी 7 तासांचा वेळ लागतो. बुलेट ट्रेन आल्यानंतर हे अंतर दीड तासांत पूर्ण करता येईल. ही देशातील चौथी बुलेट ट्रेन असेल. 

4/7

मुंबई ते नागपूर दरम्यानही बुलेट ट्रेन चालवण्याची तयारी सुरू आहे. या दोन्ही शहरांतील अंतर 770 किमी असून हे पूर्ण करण्यासाठी 10 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर हे अंतर सव्वा दोन तासांत पूर्ण होणार आहे. 

5/7

 मुंबईला आणखी एक बुलेट ट्रेनचं गिफ्ट मिळणार असून ही ट्रेन पुण्याहून हैदराबाद येथपर्यंत धावणार आहे. मुंबई ते हैदराबादपर्यंतचे अंतर 700 किमी असून हे पूर्ण करण्यासाठी जवळपास 13 तासांचा वेळ लागतो. बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर हे अंतर 2.10 तासांत पूर्ण करता येऊ शकते. हा देशातील सहावा बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. 

6/7

देशातील सातवी बुलेट ट्रेन चेन्नई ते बेंगळुरू मार्गावरुन मैसूरपर्यंत जाते. भारतीय रेल्वेने या मार्गावर बुलेट ट्रेन चालवण्याची तयारी सुरू केली आहे. चेन्नई ते मैसूर दरम्यानचे अंतर 481 किमी आहे. हे पार करण्यासाठी जवळपास 9 तासांचा वेळ लागतो. मात्र, एकदा का बुलेट ट्रेन सुरू झाली की हे अंतर 1.30 तासांत पूर्ण करता येईल. 

7/7

सरकारने आठवी बुलेट ट्रेन चालवण्याचाही प्लान तयार करत असल्याचं बोललं जात आहे. ही ट्रेन वाराणसी ते हावरा दरम्यान चालवण्यात येईल. दोन्ही शहरांतील अंतर 676 किमी इतके आहे. हे पूर्ण करण्यासाठी 15 तासांपेक्षा अधिक वेळ लागतो. एकदा की ही बुलेट ट्रेन सुरू झाली की हे अंतर 2 तासांत पूर्ण केले जाईल.