PHOTO : पाकिस्तानमध्ये जन्म, पण भारतावर प्रेम; पद्मश्री पुरस्कार अन् वाद, 18 वर्षात 4 वेळा निकाह
Entertainment : अमजद खान आणि अमिताभ बच्चनसोबत दिसणारा हा चिमुकला आज त्याच्या आवाजाने चाहत्यांचा मनावर राज्य करतो. त्याने बराच काळ पाकिस्तानात घालवला असला तरी त्याच प्रेम भारतावर आहे.
नेहा चौधरी
| Aug 15, 2024, 08:57 AM IST
1/12
2/12
15 ऑगस्ट 1971 साली लंडनमध्ये जन्माला आवाजाचा जादूगार अदनान सामी. वडील पाकिस्तानी हवाई दलात पायलट तर आई नौरीन खान एक भारतीय होती. त्या जम्मूची रहिवासी होती. अदनान कॅनडा आणि संयुक्त अरब अमिरातीमध्येही राहिला. पण जे प्रेम आणि आदर त्याला भारतात मिळाला ते त्याला कुठेच मिळालं नाही. याच कारणामुळे अदनान सामीने भारतात, मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
3/12
4/12
त्याने एका मुलाखतीत मला मुंबईत खूप छान आणि आरामदायी वाटतं. म्हणून मी भारतीय नागरिकत्व घेतलं असं सांगितलं. त्यामुळे त्याचे पाकिस्तानमधील चाहते नाराज झाले. सोशल मीडियावर लोक अदनान सामीला 'देशद्रोही' म्हणू लागले. पण त्याने कसलीही पर्वा केली नाही. एवढंच नाही तर 2016 मध्ये अदनान सामीने एका ट्विटने पाकिस्तानाची झोप उडवली. त्याने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईकच्या भारताच्या निर्णयाचं त्याने कौतुक केलं होतं.
5/12
6/12
7/12
अदनान सामी गेल्या 24-25 वर्षांपासून मुंबईत राहतो. पण जेव्हा 2020 मध्ये अदनानला पद्मश्री पुरस्काराशी निवडण्यात आलं तेव्हा भारतात एकच नाराजीचा सूर उमटला. राष्ट्रवादीसह अनेक राजकीय पक्षांनी याला विरोध केला. अदनानला पद्मश्री देणे म्हणजे 130 कोटी भारतीयांचा अपमान असेल असं राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं होतं.
8/12
अदनान सामी गायिका आशा भोसले यांना त्यांची 'संगीत आई' म्हणतो. आशा भोसले यांनीच त्यांना संगीताच्या जगात येण्याचा सल्ला दिला होता. अदनान सामी 10 वर्षांचा असताना आशा भोसले यांना पहिल्यांदा भेटला होता. आशा भोसले यांनीच त्यांना कॅनडातून भारतात ये आणि इथेच करिअर कर, असं म्हटलं होतं. आशा भोसले यांचा सल्ला घेण्यासाठीच अदनान सामी भारतात आला होता. पण त्यांना आशा भोसले यांच्यासोबत 'कभी तो नजर मिलाओ' हे पहिलं गाणं गाण्याची संधी मिळाली. अदनान सामीच्या स्टारडमची सुरुवात झाली.
9/12
10/12
11/12
12/12