Independence Day : नवं वर्ष, नवा फेटा... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खास पेहराव

लाल किल्ल्यावर 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधनांचा पेहराव हा लक्षवेधी ठरला. 

'विकसित भारत @ 2047' ही 78 व्या स्वातंत्र्य दिनाची खास थिम असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर देशवासियांना संबोधित करताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणासोबतच त्यांचा पेहराव हा देखील चर्चेचा विषय असतो. यंदा पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा 15 ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास झलक त्यांच्या पेहरावातून अधोरेखित होतो. भारतीय संस्कृती जपणारा असा पोशाख पंतप्रधानांचा होता. पांढऱ्या रंगाचा कुर्ता, निळं जॅकेट आणि भगव्या आणि हिरव्या रंगाचा फेटा त्यांनी परिधान केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फेटे कायमच चर्चेचा विषय असतात. आतापर्यंत त्यांचे फेटा परिधान केलेले वेगवेगळे लूक पाहणार आहोत. 

1/11

2024

पीएम मोदी यांनी आज भारतीय संस्कृती जपणारा पेहराव केला होता. यावेळी पांढरा कुर्ता, निळं जॅकेट आणि बहुरंगी लेहरीया प्रिंटचा फेटा असा पोशाख होता. भगवा, हिरवा आणि हिरव्या रंगांचा फेट्यामध्ये समावेश आहे. भारतीय संस्कृतीचं प्रतिक पीएम मोदी यामधून जपताना दिसत आहेत. 

2/11

2023

गेल्या वर्षी पीएम मोदींनी ऑफ-व्हाइट कुर्ता आणि चुरीदार आणि काळ्या जाकीटसह राजस्थानी शैलीचा फेटा घातला होता.

3/11

2022

2022 मध्ये, पंतप्रधानांनी तिरंगा प्रिंटसह एक पांढरा फेटा निवडला. आणि त्यास पारंपारिक पांढरा कुर्ता-पायजमा सेट आणि फिकट निळा कमरकोट - राष्ट्रध्वजाच्या रंगांना मूर्त रूप दिले.

4/11

2021

लाल रंगाचा पॅटर्न असलेला फेटा मोदी यांनी 2021 मध्ये परिधान केला होता. यामध्ये भगव्या रंगाची जोड देखील होती. पारंपारिक कुर्ता आणि निळ्या जाकीटने पूरक असलेला चुरीदार परिधान केलेल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले.

5/11

2020

PM मोदींनी 2020 मध्ये केशर आणि क्रीम असा फेटा घातला होता. त्यांनी पेस्टल शेडमध्ये हाफ-स्लीव्ह कुर्ता, सफेद जुडीदार असा पेहराव होता.   

6/11

2019

73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, पीएम मोदींनी राजस्थानमधील चमकदार पिवळा पगडी फेटा म्हणून निवडली होती. त्यासोबत हाफ स्लीव्ह कुर्ता आणि चुरीदार असा पोशाख होता. 

7/11

2018

लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधानांनी फेटा घातला होता. यावेळी पुन्हा एकदा भगवा आणि लाल रंगाची निवड करण्यात आली. 

8/11

2017

2017 मध्ये स्वातंत्र्य दिनासाठी PM मोदींची पगडी चमकदार पिवळा आणि लाल रंगाची होती. ज्यावर सर्वत्र सोनेरी रेषा आहेत. यावेळी मोदींनी बेज कलरच्या हाफ-स्लीव्हच्या कुर्त्याने लूक पूर्ण केला.

9/11

2016

पंतप्रधानांनी गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या फेट्याची निवड केली होती. यावेळी त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. 

10/11

2015

लाल किल्ल्यावरील सोहळ्यासाठी कुर्ता, मोदी जाकीट आणि एकाच रंगाच्या वेगवेगळ्या शेड्समध्ये क्रॉसक्रॉस केलेला पिवळा फेटा असा पोशाख पंतप्रधानांनी निवडला होता. 

11/11

2014

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी I-Day साठी फेट्याकरिता हिरव्यासह चमकदार लाल रंगात जोधपुरी बांधेज पगडी निवडली.