'या' चित्रपटाच्या सेटवर सैफ अली खान झाला होता जखमी, डोक्याला पडले होते 100 टाके

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने 'आशिक आवारा' या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने अनेक हिट चित्रपट केले. मात्र, एका चित्रपटाच्या सेटवरील अभिनेत्याची घटना सांगणार आहेत. जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. 

| Sep 15, 2024, 18:54 PM IST
1/7

'क्या कहना'

सैफ अली खान आणि प्रीती झिंटा यांचा 'क्या कहना' हा चित्रपट 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. 

2/7

मोठी घटना

मात्र, या चित्रपटाच्या सेटवर अभिनेता सैफ अली खानसोबत एक मोठी घटना घडली होती. ती घटना फार कमी लोकांना माहित आहे. या घटनेत अभिनेत्याला 100 टाके पडले होते. 

3/7

खुलासा

याचा खुलासा स्वत: सैफ अली खानने केला होता. या चित्रपटात त्याला बाईकवरून उडी मारावी लागली होती. हा शूट खंडाळ्यात झाला होता. त्यावेळी खूप पाऊस पडला होता. 

4/7

बाईक घसरली

त्यावेळी अभिनेत्याच्या मनात फक्त प्रीती झिंटाला इम्प्रेस करायचं हा विचार सुरु होता. त्यावेळी बाईकवरून उडी मारताना बाईक घसरली आणि मी हवेत उडी मारून एका खडकावर आदळलो. 

5/7

100 टाके

खडकावर आदळल्याने अभिनेत्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला दवाखान्यात घेऊन गेले. त्यावेळी त्याच्या डोक्याला 100 टाके पडले होते. 

6/7

सुपरहिट चित्रपट

अभिनेता सैफ अली खानने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ज्यामध्ये 'कॉकटेल', 'ओमकारा' आणि 'तानाजी' सारखे अनेक चित्रपटांचा समावेश आहे. 

7/7

'देवरा'

सध्या अभिनेता सैफ अली खान 'देवरा' या चित्रपटात साउथ सुपरस्टार जूनियर एनटीआर आणि अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत दिसणार आहे.